मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /GHKPM : दीरानं केली भाऊजयीची डिलिव्हरी; प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप, म्हणाले....

GHKPM : दीरानं केली भाऊजयीची डिलिव्हरी; प्रेक्षकांनी व्यक्त केला संताप, म्हणाले....

हिंदी मालिका 'गुम है किसी के प्यार में' सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मालिका एका वेगळ्याच वळणार आली आहे. यामधील प्रत्येक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

हिंदी मालिका 'गुम है किसी के प्यार में' सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मालिका एका वेगळ्याच वळणार आली आहे. यामधील प्रत्येक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

हिंदी मालिका 'गुम है किसी के प्यार में' सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मालिका एका वेगळ्याच वळणार आली आहे. यामधील प्रत्येक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

मुंबई, 6 ऑगस्ट : मराठी आणि हिंदी मालिकांनी आजकाल सगळ्यांनाच वेड लावलं आहे. एकापेक्षा एक मालिका रोज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. यामध्ये अनेक मालिका प्रेक्षकांच्या लोकप्रिय बनतात तर काहींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशातच हिंदी मालिका 'गुम है किसी के प्यार में' Gum Hai Kisi Ke Pyar Mai) सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मालिका एका वेगळ्याच वळणार आली आहे. यामधील प्रत्येक सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मालकेतील नुकत्याच दाखवलेल्या प्रोमो सीनमुळे प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

'गुम है किसी के प्यार में' मालिकेच्या आगामी भागात विराट पाखीची डिलिव्हरी करणार आहे. प्रोमोमध्ये दिसतंय की, घरी कोणी नसताना विराटला पाखीची डिलिव्हरी करावी लागते. सई व्हिडिओ कॉलवर सूचना देते. त्या फॉलो करत विराट पाखीची डिलिव्हरी करणार आहे. या मालिकेत 3 इडियट्सचा सीन तयार केला जाणार असल्याचं प्रोमोवरुन समजतंय. मात्र हा सीन पाहून प्रेक्षक संतापले आहेत. टीआरपीसाठी मेकर्सनं दीराला भाऊजयीची डिलिव्हरी करताना दाखवलं आहे, असं म्हटलं जातंय.

हेही वाचा -  Farmani Naaz : 'हर हर शंभू' गाण्यामुळे वादात सापडली पण नशीब उजळलं, आता 'बिग बॉस 16'मध्ये करणार एन्ट्री?

मालिकेतील आगामी भागाच्या प्रोमोवरुन सध्या प्रेक्षक कमालीचे भडकले आहेत. अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. हा शो घरातील सदस्यांसोबत पाहण्यासारखा नाही असंही म्हटलं जातंय. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या मालिकेला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. नील भट्ट, ऐश्वर्या शर्मा आणि आयेशा सिंग स्टारर 'गुम है किसी के प्यार में' मालिकेत सतत असे ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत.

एकीकडे पाखी मुलाला जन्म देते हे दाखवले पण खरा ट्विस्ट तेव्हा येईल जेव्हा दुसरीकडे सईही प्रेग्नंट होईल. ती एका मुलीला जन्म देईल. त्याच वेळी शोमध्ये 8 वर्षांची जनरेशन लीप दाखवला जाणार आहे. यामुळे मालिका नव्या वळणार पहायला मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Social media, TV serials, Viral videos