मुंबई, 19 मे : मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी कलाकार म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखलं जातं. संकर्षण फक्त अभिनयचं नाही तर त्यासोबतच बऱ्याच कलागुणांनी परिपूर्ण आहे. सध्या संकर्षण मालिका, चित्रपट, रंगभूमी अशा तीनही माध्यमात जोरदार काम करत आहे. संकर्षणच्या मोकळ्या स्वभावामुळे महाराष्ट्रातील घराघरात त्याचे चाहते आहेत. पण सध्या संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग देशातच नाही तर परदेशात देखील जोरदार सुरु आहेत. नुकतंच संकर्षण आणि या नाटकातील इतर कलाकार ऑस्ट्रेलिया वारी करून आलेत. पण आता भारतात परतताच संकर्षणने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या रोजच्या आयुष्यातील घडमोडीही प्रेक्षक-चाहत्यांबरोबर शेअर करतो. तसंच त्याला मराठी नाटकांच्या प्रयोगादरम्यान विविध अनुभव येतात. ते संकर्षण चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो. आताही अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. संकर्षणच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत याविषयी माहिती चाहत्यांना दिली आहे.
संकर्षणने या पोस्टमध्ये हाताला जखम झाल्याचा फोटो शेअर करत म्हटलंय कि, ‘परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला…मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले … त्यात माझा १ (एक) हात जखमी झालाय…ह्याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करतोय..’ हाताला जखम झाल्याची माहिती संकर्षणाने अतिशय मिश्किल शब्दात दिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला त्याला दिला आहे. शालिनी पोहोचली कोकणात! अभिनेत्रीनं मारला फणसावर ताव, पाहून तोंडाला सुटेल पाणी पण ही पोस्ट पाहता संकर्षणच्या हाताला खरंच दुखापत झाली आहे की, तो त्याच्या आगामी नाटक किंवा चित्रपटाचं प्रमोशन करत आहे असा अंदाज देखील नेटकरी लावत आहेत. संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टचा त्याच्या कोणत्या चित्रपटाशी किंवा नाटकाशी संबंध आहे हे समोर आलेलं नाही. पण त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशीने संकर्षणच्या या पोस्टवर “मस्त रे” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे संकर्षणची ही पोस्ट प्रमोशनल असल्याचं दिसत आहे. पण आता तो नक्की कशाविषयी बोलतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
संकर्षणच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर येणाऱ्या काळात त्याच्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग होणार आहेत. तसेच ‘नियम व अटी लागू’ या नाटकलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. याशिवाय संकर्षण लवकरच झी मराठीवर “महाराष्ट्राची किचन क्वीन” या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील करताना दिसणार आहे. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर संकर्षण सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या कविता प्रचंड व्हायरल होतात.