Home /News /entertainment /

संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ दिसणार नव्या मालिकेत ; साकारणार कलरफुल्ल भूमिका

संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ दिसणार नव्या मालिकेत ; साकारणार कलरफुल्ल भूमिका

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे( sankarshan karhade) समीरची भूमिका साकरताना दिसून येत आहे. आता संकर्षणचा भाऊ देखील एका नव्या मालिकेत दिसणार आहे.

  मुंबई, 22 जानेवारी- माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे( sankarshan karhade)  समीरची भूमिका साकरताना दिसून येत आहे. या भूमिकेला प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळत आहे. संकर्षणचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे हा देखील अभिनेता आहे. आता संकर्षणचा भाऊ देखील एका नव्या मालिकेत दिसणार आहे. अधोक्षज कऱ्हाडेने  (adhokshaj karhade ) सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याहबद्दल माहिती दिली आहे. स्टार प्रवाहवरील पिंकीच विजय असो  (pinkicha vijay asoo)  या मालिकेत अधोक्षज बंटीची हटके भूमिका निभावताना दिसणार आहे. येत्या 31 जानेवारी 2022पासून रात्री 11 .00वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. अधोक्षज कऱ्हाडेने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, जसा पेहराव,भूमिकापण अगदी तशीच!एकदम कलरफुल्ल 🌈"बंटी".नवीन मालिका,नवीन भूमिका,नवं आव्हान!"पिंकीचा विजय असो!"
  संकर्षण कऱ्हाडे आणि अधोक्षज कऱ्हाडे बालपणापासून नाटकांमध्ये काम करत आहे. अधोक्षज झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो झीवरील घेतला वसा टाकू नको या मालिकेत दिसला होता. शांतता! मराठीचं कोर्ट चालू आहे, या लघुपटात देखील तो दिसला आहे. आता तो नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पिंकीचा विजय असो या मालिकेत अमिता खोपकर, पियुष रानडे, हर्षद नायबळ,  अंकिता जोशी, कल्याणी जाधव, मुकेश जाधव, सुनील तावडे असे कलाकार दिसणार आहेत. वाचा-'अग्गंबाई सासूबाई'तील असावरी- अभिजीत पुन्हा एकत्र ; न्यू प्रोजक्टला सुरूवात पिंकीच विजय असो या मालिकेत विजय आंदळकर आणि शरयू सोनवणे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. युवराज धोंडेपटील आणि पिंकीची हटके प्रेमकहाणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. युवराज आणि पिंकीच्या या कथेत कलरफुल्ल बंटीची भूमिका नेमकी काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या