एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिलेल्या अभिनेत्या नर्गिस (Nargis Dutt) यांना आजही लोक त्यांच्या अभिनयासाठी, सौंदर्यासाठी ओळखतात. अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) नर्गिस यांच्या वाढदिवशी आपल्या आईसमवेत काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत संजय आणि नर्गिस आणि त्याच्या दोन बहिणी दिसत आहेत.
नर्गिस यांनी अनेक हिट चित्रपटांत काम केलं. 'मदर इंडिया' चित्रपटानंतर त्यांना प्रेक्षक मदर इंडिया म्हणू लागले.
नर्गिस आपल्या मुलांवर अतोनात प्रेम करत होत्या पण 1980 त्या कॅन्सरग्रस्त झाल्या. त्यांना आपल्या मुलाचा पहिला चित्रपट पाहायचा होता. पण त्या पाहू शकल्या नाहीत.
संजय दत्तच्या ‘रॉकी’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या केवळ 3 दिवस आधी 3 मे 1981 ला नर्गिस यांच निधन झालं. त्यामुळे संजय दत्तला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता.