मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आई झाल्यानंतर समीरा होती नैराश्येत; कशी केली मानसिक समस्येवर मात

आई झाल्यानंतर समीरा होती नैराश्येत; कशी केली मानसिक समस्येवर मात

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी हवाहवासा असलेला आणि अविस्मरणीय असा अनुभव असतो; मात्र आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि आयुष्य जणू नवी ओळखच धारण करतं.

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी हवाहवासा असलेला आणि अविस्मरणीय असा अनुभव असतो; मात्र आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि आयुष्य जणू नवी ओळखच धारण करतं.

आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी हवाहवासा असलेला आणि अविस्मरणीय असा अनुभव असतो; मात्र आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि आयुष्य जणू नवी ओळखच धारण करतं.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 10 मे: आई होणं हा प्रत्येक स्त्रीसाठी हवाहवासा असलेला आणि अविस्मरणीय असा अनुभव असतो; मात्र आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि आयुष्य जणू नवी ओळखच धारण करतं. अनेकींना हा अनुभव चांगला वाटत असला, तरी काही जणींना या काळात मानसिक ताण-तणावांशीही सामना करावा लागतो. शारीरिक त्रास तर असतातच. शारीरिक त्रास औषधोपचारांनी बरे होत असले, तरी बाळंतपणानंतरच्या मानसिक समस्यांशी (Postpartum Depression) सामना करणं तितकं सोपं नसतं; पण घरातल्या सर्वांचा पाठिंबा आणि चांगल्या तज्ज्ञाचा योग्य सल्ला मिळाला, तर त्यातूनही बाहेर पडता येतं. बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy) हिला पहिल्या बाळंतपणानंतर अशा गंभीर मानसिक समस्येला तोंड द्यावं लागलं होतं; मात्र दुसऱ्या बाळंतपणापर्यंतच्या (Pregnancy) काळात तिने त्या परिस्थितीत बदल घडवून आणला आणि ते बाळंतपण एंजॉय केलं. 'ह्युमन्स, ऑफ बॉम्बे'ने नुकताच समीराशी संवाद साधला होता. त्या वेळी समीराने आई झाल्यानंतरच्या काळात आपण कोणत्या मानसिक अवस्थेतून गेलो होतो आणि त्यातून बाहेर येण्यासाठी काय केलं, याबद्दलचे अनुभव सांगितले.

अक्षय वर्दे (Akshay Varde) हे समीराच्या पतीचं नाव. समीरा-अक्षय यांना हंस (Hans) नावाचा मुलगा आणि नायरा (Nyra) नावाची मुलगी अशी दोन मुलं आहेत.

अगं बाई.. अरेच्चा! केदार शिंदे दुसऱ्यांदा अडकले विवाह बंधनात, 25 वर्षांनी पूर्ण झाली हौस

समीरा सांगते, 'आई होण्याच्या माझ्या संकल्पनेवर बॉलिवूडचा प्रभाव होता. त्यामुळे पहिल्या हंसच्या वेळी 'बेबी बम्प' (Baby Bump) मिरवणारे फोटो काढणारी एक पेज थ्री मॉम अशी माझी स्वतःबद्दलची कल्पना होती. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. बाळंतपणाच्या अखेरीला माझं वजन 105 किलोपर्यंत गेलं. माझा बॉलिवूडशी असलेला संपर्क पूर्णतः तुटला होता. तसंच, अॅलोपेशिया एरियाटा (Alopecia areata) नावाचा आजारही मला झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे माझ्या डोक्यावरच्या केसांचे पुंजकेच्या पुंजके पडत होते. या सगळ्यामुळे मी मानसिक संघर्ष करत होते. माझा नवरा अक्षय मुलाचं सगळं करत होता. अगदी डायपर बदलण्यापासून त्याला भरवण्यापर्यंत. मी मात्र कुढत होते. हॉस्पिटलमधून मला डिस्चार्ज मिळाल्यावर मी खूप रडले. हंससाठी मी काहीच केलं नाही, म्हणून माझ्या मनात अपराधी भावनाही होती. माझ्या सासूबाईंनी विचारलं, की 'तुझा मुलगा हेल्दी आहे, नवरा सपोर्टिव्ह आहे, मग तू अपसेट का आहेस?' त्यांच्या या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. ही स्थिती जवळपास वर्षभर राहिली. मी अनेकदा रडायचे. फिल्म इंडस्ट्रीशी तर माझा संपर्क अजिबातच नव्हता.'

ही समस्या खूपच गंभीर आहे, हे तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने एका चांगल्या होमिओपॅथशी चर्चा केली. तिच्या सगळ्या प्रकारच्या समस्या तिने त्यांच्यासमोर मांडल्या. ज्या इंडस्ट्रीतल्या व्यक्तींवर लोकांची सतत बारीक नजर असते, अशा इंडस्ट्रीत आपण अतिवजनदार झालो आहोत, याचा मानसिक ताण तिने बोलून दाखवला. त्या चर्चेतून ती मोकळी झाली, तिच्या विचारांना नवी दिशा मिळाली आणि आपला जणू पुनर्जन्मच झाला, असं तिला वाटलं.

'दोन वर्षं माझं अस्तित्व बाह्य जगात कुठेच नव्हतं. त्यानंतर मी सोशल मीडियावर आले. त्यानंतरही मला विचारणा झाली, की 'तू यम्मी मम्मी होणार आहेस की पुन्हा सेक्सी सॅम होणार आहेस?' पण मी फक्त फॉलोअर्स मिळवण्यासाठी खोटं बोलणार नव्हते. मी माझ्या समस्यांबद्दलच बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला मला मी 'पर्फेक्ट' दिसत नसल्याबद्दल ट्रोल केलं गेलं. नंतर 2018मध्ये मला नायराच्या वेळी दिवस राहिले. तेव्हा मी ठरवलं, की पहिल्या बाळंतपणात आपण जो आनंद घेतला नाही, तो या दुसऱ्या वेळी घ्यायचा आणि माझ्या पद्धतीनेच जगायचं,' असं समीराने सांगितलं.

नायराच्या वेळी दिवस राहिले तेव्हा समीरा चाळिशीत होती. तरीही तेव्हा तिने बाळंतपणाचा सगळा आनंद घ्यायचं ठरवलं होतं. आठ महिन्यांची गर्भवती असताना तिने अंडरवॉटर बिकिनी शूटही केलं. आता ती #ImperfectlyPerfect या हॅशटॅगने अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर करत असते. आता अनेक महिला तिला सांगितलं, की ती त्यांच्यासाठी प्रेरक व्यक्तिमत्त्व आहे.

'पूर्वी माझे हात थोडे गुबगुबीत झाले, तरी माझ्यासकट अनेकांना ते खटकायचं. आता मी 42 वर्षांची आहे. जाड आहे आणि तरीही आनंदी आहे, (I’m 42, chubby & fabulous!)' असं समीरा सांगते. तिच्या मानसिकतेत झालेला बदलच यातून दिसतो. गेल्या महिन्यात समीरा-अक्षय आणि त्यांची दोन्ही मुलं असे सगळेच जण कोविड पॉझिटिव्ह आले होते. काही दिवसांनी ते बरे झाले.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment