मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /समंथाच्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच चर्चा; ‘खुशी’मध्ये विजय देवरकोंडसह इंटिमेट सीन्स?

समंथाच्या सिनेमाची प्रदर्शनाआधीच चर्चा; ‘खुशी’मध्ये विजय देवरकोंडसह इंटिमेट सीन्स?

साऊथ इंडस्ट्रीची क्रश अभिनेत्री समंथा प्रभूची (Samantha ruth prabhu) सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समंथा लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासोबत (vijay deverakonda) लिपलॉक सीन करताना दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.

साऊथ इंडस्ट्रीची क्रश अभिनेत्री समंथा प्रभूची (Samantha ruth prabhu) सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समंथा लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासोबत (vijay deverakonda) लिपलॉक सीन करताना दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.

साऊथ इंडस्ट्रीची क्रश अभिनेत्री समंथा प्रभूची (Samantha ruth prabhu) सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. समंथा लवकरच अभिनेता विजय देवरकोंडासोबत (vijay deverakonda) लिपलॉक सीन करताना दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.

  मुंबई, 20 मे: काही दिवसांपूर्वीच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने (Vijay Deverakonda) आपल्या खुशी या चित्रपटाचा फर्स्ट (kushi movie first look) लुक शेअर केला होता. त्यानंतर बुधवारी त्याने या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकची (kushi movie title track) एक झलक आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली.  या चित्रपटामध्ये विजयसोबत समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) झळकणार आहे. शिवाय बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटामध्ये दोघांची इंटिमेट केमिस्ट्री आपल्याला पहायला मिळणार आहे.

  बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, समंथा आणि देवरकोंडा यांच्यामधील बरेच पॅशनेट लिप किसिंग सीन (Samantha Vijay lip-lock scene) या चित्रपटात असणार आहेत. तसंच या दोघांचे काही इंटिमेट सीन्सही (Vijay Deverakonda Samantha intimate scenes) चित्रपटात पहायला मिळू शकतात. दरम्यान, या सिनेमाला आतापासूनच मिळणारा प्रतिसाद पाहून विजयने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. “तुमचे प्रेम पाहून आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. आम्ही हे सर्व प्रेम या ख्रिसमसला मोठ्या पडद्यावर आणू. तोपर्यंत तुम्हाला आवडलेला हा टायटल ट्रॅक पाहा.” अशा कॅप्शनसह विजयने हा टायटल ट्रॅक शेअर केला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक समंथानेदेखील शेअर केला आहे. हा चित्रपट (Kushi movie) एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे असं तिनं म्हटलं आहे.

  हेही वाचा - Cannes 22: Botox Job च्या चर्चेने ऐश्वर्या ट्रोल, काय आणि कशी असते बोटॉक्स प्रोसिजर?

  मैत्री मूव्ही मेकर्स हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर, शिव निर्वाणा (Shiva Nirvana) याचे दिग्दर्शक आहेत. यामध्ये जयराम, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, लक्ष्मी, अली, रोहिणी, वेन्नेला किशोर, राहुल रामकृष्णा, श्रीकांत अय्यंगार आणि शरण्या हे कलाकारदेखील (Kushi Movie cast) दिसतील. हृदयम या प्रसिद्ध चित्रपटाचे म्युझिक डायरेक्टर हेशम अब्दुल वहाब यांनीच ‘खुशी’लादेखील संगीत दिलं आहे. हा चित्रपट तेलुगू, तमीळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी 23 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला (Kushi movie release date) येणार आहे.

  समंथाचा दृढावला आत्मविश्वास

  काही दिवसांपूर्वीच नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतलेली समंथा आता वेगवेगळ्या रोलमध्ये दिसून येत आहे. तिने नुकतंच पिकॉक मॅगझीनसाठी फोटोशूट केलं होतं. यामधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने स्वतःचा आत्मविश्वास आता वाढल्याचं सांगितलं. “चित्रपटसृष्टीमध्ये इतकी वर्षं काम केल्यानंतर मला आता स्वतःबद्दल आत्मविश्वास (Samantha bold photoshoot) आला आहे. त्यामुळे मी आता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका स्वीकारत आहे. एखादे आयटम साँग असो वा अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिका, मी आता ती अधिक आत्मविश्वासाने करू शकते.” असं तिने हे फोटो शेअर करताना म्हटलं होतं.

  First published:

  Tags: Tollywood