मुंबई, 20 ऑगस्ट- कलाकारांच्या खाजगी आयुष्याबाबत प्रत्येक लहान-लहान गोष्ट जाणून जाणून घेण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते.सोबतच आपल्या आवडत्या कलाकारांच्या बालपणाचे फोटो पाहण्याचीही चाहत्यांना मोठी आवड असते. आपला लाडका अभिनेता किंवा अभिनेत्री पूर्वी कसे दिसायचे यामध्ये चाहत्यांना फारच रस असतो. अनेक कलाकार सोशल मीडियावर आपले थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. हे फोटो चाहत्यांकडून प्रचंड पसंत पडत असतात. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.या फोटोमध्ये एक गोंडस चिमुकली दिसून येत आहे.पायात मोजे,अंगावर छोटंसं स्वेटर, डोक्यावर टोपडं आणि एक हात तोंडात घालून ही चिमुकली कॅमेऱ्याला पोज देताना दिसत आहे. ही छोटीशी मुलगी आज बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.इतकंच नव्हे तर तिने हॉलिवूडमध्येसुद्धा काम केलं आहे.तुम्हाला अजूनही ओळखली नसेल तर,आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ही मुलगी इतर कुणी नसून बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे.वाटलं ना आश्चर्य?हो ही चिमुकली दीपिका पादुकोणचं आहे. मध्यंतरी दीपिकाने आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला होता. सध्या हा फोटो नव्याने व्हायरल होत आहे.दीपिका पादुकोण सतत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असते.ती सतत आपले खाजगी आयुष्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.या फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात. दीपिका ही बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची लेक आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रात चांगल नाव कमावलं होत.
**(हे वाचा:** दीपिका-रणवीरचा थाटामाटात गृहप्रवेश; समोर आली नव्या अलिशान घराची पहिली झलक ) दीपिका पादुकोणने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.आपल्या पहिल्याच चित्रपटामुळे दीपिका रातोरात स्टार बनली होती.त्यांनंतर दीपिकाने बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.या कालावधीत दीपिकाने अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, रामलीला, ये जवानी है दिवानी या चित्रपटांचा त्या यादीत समावेश होतो.दीपिका काही दिवसांपूर्वी ‘गेहेराइयां’ मध्ये दिसली होती.आगामी काळात दीपिककडे अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्स आहेत.