जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: Tattoo नकोच गं बाई! नागा चैतन्यसाठी 3-3 टॅटू काढणारी समंथा आता असं काय म्हणाली?

VIDEO: Tattoo नकोच गं बाई! नागा चैतन्यसाठी 3-3 टॅटू काढणारी समंथा आता असं काय म्हणाली?

VIDEO: Tattoo नकोच गं बाई! नागा चैतन्यसाठी 3-3 टॅटू काढणारी समंथा आता असं काय म्हणाली?

घटस्फोट घेतल्याने झालेल्या टीकेपासून ते ‘पुष्पा: द राइज’ या सिनेमातील ‘ऊ अंटवा..’ या आयटम साँगपर्यंत… समंथाशी संबंधित सर्व गोष्टींची नेहमीच चर्चा होत आली आहे. समंथाने नागा चैतन्यशी कनेक्शन असणारे 3 टॅटू काढले आहेत याविषयी देखील चर्चा झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपलने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी (Actress Samantha Ruth Prabhu and Naga Chaitanya separation) आणि फिल्मी जगतासाठी देखील धक्कादायक होता. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये (Samantha Naga Chaitanya Divorce) या जोडीने घटस्फोट घेतला. दरम्यान यानंतर समंथा विशेष चर्चेत आली. घटस्फोट घेतल्याने झालेल्या टीकेपासून ते ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise Oo Antava) या सिनेमातील ‘ऊ अंटवा..’ या आयटम साँगपर्यंत… समंथाशी संबंधित सर्व गोष्टींची चर्चा झाली. यामध्ये समंथाने नागा चैतन्यशी कनेक्शन असणारे 3 टॅटू काढले आहेत याविषयी देखील चर्चा झाली. दरम्यान समंथा म्हणते की जर तिला तिच्या तरुणपणाला जर काही सल्ला द्यायचा असेल, तर तो असा आहे की कधीच टॅटू काढू नका. समंथा रुथ प्रभुने अलीकडेच इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसह Ask Me Anything session चे सेशन केले होते. त्यावेळी एका युजरने तिला अशी टॅटू आयडिया सुचवण्यास सांगितले, जी कधीतरी तिला काढून घ्यायला आवडेल. त्यावेळी उत्तर देताना समंथाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने असं म्हटलं आहे की- मी माझ्या तरुण व्हर्जनला एक गोष्ट सांगेन ती म्हणजे कधीही टॅटू काढू नको. कधीच नाही. कधीच नाही. कधीही टॅटू काढू नको.’ आश्चर्याची बाब म्हणजे समंथाने तीन टॅटू काढले आहेत आणि त्यांचे काहीना काही तरी कनेक्शन नागा चैतन्य याच्याशी आहे.

News18

समंथानं आपल्या छातीच्या उजव्या बाजूला मधल्या भागात ‘Chay’ असं गोंदवून घेतलेलं आहे. नागा चैतन्य आणि समंथा यांच्यामध्ये जेव्हा सारं काही आलबेल होतं, त्यावेळी अनेकदा समंथा हा टॅटू फ्लाँट करताना दिसायची. समंथा प्रेमानं नागा चैतन्यला ‘Chay’ असं म्हणत असे. पाठीवर मानेच्या थोडं खालच्या बाजूला तिनं YMC अर्थात ‘ये माया चेसावे’ (Ye Maaya Chesave) या आपल्या पहिल्या चित्रपटाच्या नावाचा शॉर्ट फॉर्म लिहिला आहे. हा या जोडीचा पहिला चित्रपट होता. चित्रपटात नागा चैतन्य आणि समंथा रोमान्स करताना दिसले होते. 2010 मध्ये आलेल्या या रोमँटिक ड्रामा चित्रपटापासूनच या जोडीचं नातं सुरू झालं होतं. समंथाचा तिसरा टॅटू मनगटावर आहे. दोन बाण असलेला असाच एक टॅटू नागा चैतन्यच्या मनगटावरदेखील आहे. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी दोघांनी एकत्रच हा टॅटू गोंदवून घेतला होता. समंथानं याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्टदेखील शेअर केली होती.

जाहिरात

समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर काही पेजेसवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात