मुंबई 16 मे: सलमान खानचा (Salman Khan) राधे (Radhe : Your Most Wanted Bhai) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाला सिनेमागृहांसोबतच OTT प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित करण्यात आलं. परंतु यामुळं पायरसीचा धोका कमालीचा वाढला आहे. किंबहुना अनेक प्रेक्षकांनी इंटरनेटवरुन राधेची पायरेडेट कॉपी डाउनलोड करुन पाहिली. मात्र अशा प्रेक्षकांवर सलमान खान संतापला आहे. (Radhe pirating copy) जर तुम्ही राधेची पायरेडेट कॉपी पाहिली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा कडक इशारा त्यानं प्रेक्षकांना दिला आहे.
“राधे' चित्रपट सर्वसामान्यांसाठी ओटीटीवर फक्त 249 रुपयांना उपलब्ध आहे. परंतु, असं असतानाही चित्रपटाची पायरसी करून ती पायरेटेड साइट्सवर दाखवण्यात येत आहे आणि असं करणं कायद्याने गुन्हा आहे. सायबर सेल या सगळ्या पायरेटेड साइट्स विरोधात कारवाई करत आहे. तुम्ही जर या पायरसीचा एक भाग बनत असाल तर सायबर सेल तुमच्या विरुद्धदेखील कारवाई करू शकतं. कृपया परिस्थिती समजून घ्या नाहीतर तुमच्यावरही सायबर सेलतर्फे कारवाई करण्यात येऊ शकते.” अशा आशयाचं ट्विट करुन सलमाननं पायरेडेट कॉपी पाहणाऱ्यांना इशारा दिला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
पाहा सिद्धार्थ जाधवची भन्नाट बॅटिंग; हॅलिकॉप्टर शॉट पाहून येईल धोनीची आठवण
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 15, 2021
13 मे ला ईदच्या मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. भारतात तो zee5 च्या झी प्लेक्स (zee plex) वर प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्याच दिवशी अनेकांनी एकाच वेळी zee5 लॉगीन केल्याने zee5 चा सर्वर क्रॅश झाल्याचं पाहायाला मिळालं. त्यामुळे प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद दिल्याचं समजतं आहे. तर भारताबाहेर दुबई, ऑस्ट्रेलिया या देशातंही चित्रपट पाहिला गेला. युएईच्या (UAE) फर्स्ट ग्लोबल प्रिमियरमध्ये राधेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. समोर आलेल्या माहितीनुसार राधेने पहिल्याच दिवशी ओव्हरसिजमध्ये 2.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे भारताबाहेर राधेला मिळत असलेला प्रतिसाद उत्तम मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Cyber crime, Entertainment, Salman khan