तब्बल 6 महिन्यांनी दबंग खान गेला सिनेमाच्या शूटला; फोटो शेअर करत सांगितली आपली अवस्था

तब्बल 6 महिन्यांनी दबंग खान गेला सिनेमाच्या शूटला; फोटो शेअर करत सांगितली आपली अवस्था

सलमान खानने (salman khan) शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर: बॉलिवूडचा दबंग सलमान खानने (Salman Khan) तब्बल साडेसहा महिन्यांनी शूटिंगला सुरुवात केली आहे. इतक्या महिन्यांनी सेटवर आल्यामुळे सलमान खानने आनंद व्यक्त केला आहे. शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साडेसहा महिन्यांनी सेटवर आल्यामुळे आनंद वाटतो आहे, असं कॅप्शनही सलमानने दिलं आहे.

कोरोनाच्या काळात सगळ्या सिनेमा आणि मालिकांचंचं शूटिंग बंद होतं. त्यामुळे सलमानच्या 'राधे: यूअर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe Your Most Wanted Bhai) या सिनेमाचं शूटिंगही थांबवण्यात आलं होतं. आता सगळ्या नियमांचं पालन करून शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे.

View this post on Instagram

Back to shoot after 6 1/2 months ... feels good #Radhe

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सिनेमाच्या सेटवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. शूट सुरू होण्याआधी कलाकारांसह सर्व टीमची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. राधे सिनेमामध्ये सलमानसोबत जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, रणदीप हुडा असे दिग्गज कलाकारदेखील खास भूमिकेत दिसणार आहेत. राधे सिनेमासोबत किक-2, कभी ईद कभी दिवाली या प्रोजेक्टवरही सलमानचं काम सुरू आहे.

हे वाचा - Big Boss14 च्या सेटवर अवतरली 'राधे मां' आणि काय घडलं पाहा VIDEO

सलमानच्या सिनेमासोबतच त्याचा लोकप्रिय शो बिग बॉसच्या 14 व्या सिझनलाही सुरुवात झाली आहे. सल्लूमिया हा शो होस्ट करतो आहे. शनिवारी 3 ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड प्रीमिअर झाला. बिग बॉस 14 (Big Boss14) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल वैद्य, एजाज खान, निक्की तांबोळी, पवित्र पुनिया अशा अनेक स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यांच्यासोबतच 14 दिवसांसाठी गौहर खान, सिद्धार्थ शुक्ला आणि हिना खान यांनाही घेण्यात आलं आहे. बिग बॉस 14 मध्ये सुरुवातीपासूनच भांडणं आणि वादावादीला सुरुवात झाली आहे. आता यात सलमानची काय भूमिका असेल हे पाहण्यासारखं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 4, 2020, 10:45 PM IST

ताज्या बातम्या