जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Big Boss14 च्या सेटवर अवतरली 'राधे मां' आणि काय घडलं पाहा VIDEO

Big Boss14 च्या सेटवर अवतरली 'राधे मां' आणि काय घडलं पाहा VIDEO

radhe maa

radhe maa

Big Boss14 च्या सेटवर आज ‘राधे मां’ एंट्री घेणार आहे. त्यावेळी नेमकी काय होईल याची झलक एकदा पाहा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 ऑक्टोबर : Big Boss 14 चा रविवारचा एपिसोड जबरदस्त होणार आहे. कारण ‘बिग बॉस’च्या घरात चक्क ‘राधे मां’ (radhe ma) अवतरली आहे. घरातील सर्व कन्टेस्टंट आपल्या खेळात रमलेले असताना अचानक ‘राधे मां’ तिथे सगळ्याना आशीर्वाद द्यायला दाखल झाली. तिथं स्पर्धकांना आशीर्वाद तर दिलाच पण त्यांच्यासोबत मनसोक्त नाचण्याचा आनंदही तिनं घेतला. ज्यांच्यावर ‘राधे मां’ खूश असते, तो शिष्यही खूश राहतो. असा आशीर्वादही ‘राधे मां’ने स्पर्धकांना दिला. सिद्धार्थ शुक्लासोबत इतर स्पर्धकांनीही ‘राधे मां’ चा आशीर्वाद घेतला. ‘राधे मां’ काही दिवसांसाठी बिग बॉसची स्पर्धक असेल अशी चर्चा रंगली होती. पण ‘राधे मां’ फक्त एका दिवसापूर्तीच सेटवर आली असल्याची शक्यता आहे. आता राधे मां परत येऊन खेळात सहभाग घेणार की एका दिवसाच्या पाहुणीसारखीच  बिग बॉसच्या घरात दिसणार हे गुलदस्त्यातच आहे.

जाहिरात

‘राधे मां’ घरी आल्यामुळे काही वेळासाठी घरातलं वातावरण थोडं बदललं, हे या प्रोमोवरून दिसून येतं. त्यामुळे तिनं जर खरोखरच शोमध्ये एंट्री घेतली तर घरात काय काय हंगामा होणार? हे लवकरच कळेल. हे वाचा -  PHOTOS : बिग बॉस- 14 मध्ये कोणाचे चालतील नियम? या विजेत्या अभिनेत्रीकडे जबाबदारी बिग बॉस-14 (Bigg Boss-14) चं ग्रँड प्रीमियर शनिवारपासून सुरू झालं आहे. बिग बॉस-7 (Bigg Boss-7) ची विजेता गौहर खान (Gauhar Khan) या सीजनमध्ये सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि हिना खान (Hina Khan) सोबत नव्या भूमिकेत दिसणार आहे. बिग बॉस 13 सुपरहिट ठरला होता आणि त्याचा टीआरपीदेखील चांगला होता. अशात नवीन सीजनकडून अपेक्षा आहेत. शोचे सर्व उमेदवारांची नावेही समोर आली आहे. यंदाचे उमेदवारही चांगले असल्याने बिग बॉस हिट होण्याची अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात