• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15 मध्ये दिसणार राखी सावंतचा नवरा! कधीही माध्यमांसमोर न आलेला चेहरा

Bigg Boss 15 मध्ये दिसणार राखी सावंतचा नवरा! कधीही माध्यमांसमोर न आलेला चेहरा

Bigg Boss Marathi च्या नव्या सीझननंतर हिंदी बिग बॉस (Bigg Boss 15) देखील लवकरच येणार आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतच्या तोंडून तिच्या नवऱ्याचं म्हणजे रितेशचे नाव ऐकलं असेल पण त्याला आजपर्यंत कुणीच पाहिलेलं नाही. (Rakhi Sawant Husband Ritesh First Public Appearance) त्यामुळे उत्सुकता आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर 2021 ; मराठी बिग बॉसची(Bigg Boss Marathi 3 Latest Update ) सगळीकडे चर्चा आहे. आता मराठी नंतर हिंदी बिग बॉस (Bigg Boss 15) देखील लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. यंदाचा हिंदी बिग बॉसचा सीजन देखील हिट ठरणार यात काही शंकाच नाही. कारण यंदा बिग बॉसच्या घरात असाच चेहरा पाहण्यास मिळणार जो आजपर्यंत कोणीच पाहिलेला नाही. या सीजन मध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतचा नवरा रितेश ( Rakhi Sawant Husband Ritesh  First Public Appearance)  दिसणार आहे. आजपर्यंत अनेकवेळा राखी तोंडून तिच्या पती म्हणजे रितेशचे नाव ऐकले आहे. मात्र नाव जरी ऐकलं तरी राकेशला आजपर्यंत कुणीच पाहिलेले नाही हेही तितकेच खरे आहे. पहिल्यांदाच सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या बिग बॉस रितेश दिसणार आहे. माध्यमांसमोर म्हणा किंवा जगासमोर येण्याची रितेशची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत अनेक जणांनी राखीचे लग्नाचे फोटो पाहिलेत. विशेष म्हणजे या फोटोत राखी एकटीच दिसत होते. तिचा पतीच चेहरा कोणीच पाहिलेला नाही. यानिमित्त रितेशचा चेहरा सर्वांना पाहता येणारा आहे. वाचा : Bigg Boss Marathi:नॉमिनेशन टास्कनंतर घरात रंगणार चिऊताईचा खेळ; पाहा कोण मारणार बाजी राखी सावंत सोशल मीडियावर नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीने 2019 मध्ये उद्योगपती रितेशसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आजपर्यंत राखीच्या तोंडून सर्वांनी तिच्या पचीचे नाव ऐकले मात्र पाहिले कधीच नाही. बिग बॉसच्या मागील सीजनमध्ये देखील अनेकवेळी राखी रितेशचे नाव काढत असे. त्याच्या काही आठवणी देखील ती स्पर्धकांसोबत शेअर करत असते. अनेकावेळा राखीने सांगितले आहे की, रितेशला प्रसिद्धीपासून लांब राहणे आवडते. त्यामुळे आजपर्यंत राकेशला कोणाला पाहता आलेले नाही.
  टाइम्सच्या रिपोर्टनुसार ‘बिग बॉस 15’ मध्ये राखी पती रितेशसोबत दिसणार आहे. त्यामुळे यंदाचा सीजन धमाका करणारा आहे एवढे मात्र नक्की आहे. यासोबतच शोप्रमाणे प्रेक्षकांना राखीच्या पतीला पाहण्याची उत्सुकता देखील लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: