जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ...', अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सलमान खानने व्यक्त केलं दु:ख

'खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ...', अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सलमान खानने व्यक्त केलं दु:ख

'खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ...', अभिनेत्याच्या मृत्यूनंतर सलमान खानने व्यक्त केलं दु:ख

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान (Salman Khan Reaction on Sidharth Shukla Death) याने देखील सिद्धार्थच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 सप्टेंबर: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याचे चाहते, कुटुंबीय यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla) आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Actor Sidharth Shukla Death) आता आपल्यात नाही यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही आहे. त्याचे सहकलाकार देखील या घटनेने पुरते हादरून गेले आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसचा होस्ट सलमान खान (Salman Khan Reaction on Sidharth Shukla Death) याने देखील सिद्धार्थच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. बिग बॉसच्या मंचावरील सलमान आणि सिद्धार्थचे काही व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या दोघांमधील बाँडिंग देखील त्यांच्या चाहत्यांनी पाहिले आहे. सिद्धार्थ अशाप्रकारे यशाच्या शिखरावर असताना त्याची अकाली एक्झिट अनेकांसाठी चटका लावणारी आहे. अभिनेता सलमान खान याने देखील ट्वीट करत सिद्धार्थच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सलमानने या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘खूप लवकर निघून गेलास सिद्धार्थ… तुझी आठवण येईल.. कुटुंबाप्रति संवेदना RIP’.

जाहिरात

अभिनेता करण कुंद्रा याने देखील बुधवारी रात्रीच सिद्धार्थशी बातचीत झाल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सिद्धार्थच्या जाण्याने त्याला धक्का बसल्याचे त्याने यामध्ये म्हटले आहे. तू कायम हसताना लक्षात राहशील अशी पोस्ट करणने शेअर केली आहे.

वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घतला आहे.कोणताही आजार, लक्षणं नसताना सिद्धार्थचा अचानक हार्ट अटॅकच्या कारणाने मृत्यू झाल्याचं समजतं. सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुरू आहे. मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की सिद्धार्थच्या मृतदेहाचे शव विच्छेदन होईल. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून (Sushant Singh Rajput Death Case) धडा घेत मुंबई पोलिसांनी सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टमची व्हिडीओग्राफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात