मुंबई, 29 जुलै : 'भारत' सिनेमा प्रियांका चोप्रानं सोडला आणि मग अनेक विषयावर चर्चा, गाॅसिपिंग सुरू झालं. महत्त्वाचं म्हणजे प्रियांका सिनेमात मुख्य भूमिकेत होती. मग आता तिच्या जागी कोण ही एकच चर्चा सुरू झालीय. सिनेमाच्या दिग्दर्शकानं अली अब्बास जफरनं ट्विट करून आम्ही लवकरच मुख्य नायिकेचं नाव घोषित करू असं सांगितलं. सलमान खान नायक म्हटल्यावर लगेचंच कतरिनाचं नाव पुढे आलं. कॅट सलमानची एक्स गर्लफ्रेंड. दोघांना एकत्र पाहायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. शिवाय सलमानला तिच्याबद्दल साॅफ्ट काॅर्नरही आहे आणि हे वेळोवेळी जाणवतंय. पण खरी बातमी वेगळीच आहे बरं का मंडळी!
Yes yes yes ... we will announce the leading lady of Bharat soon.. We have been shooting Non stop and the simultaneously preparing for international schedules ....
— ali abbas zafar (@aliabbaszafar) July 28, 2018
आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सिनेमात करिना कपूर खानची वर्णी लागणार आहे. सलमान खान आणि करिनानं बजरंगी भाईजान, बाॅडीगार्ड सिनेमात एकत्र काम केलं होतं आणि ते सिनेमे हिटही झाले होते. त्यामुळे भारतमध्ये करिना कपूर असण्याची शक्यताही वर्तवली जातेय.
हेही वाचा
सध्या भारतचं शूटिंग जोरदार सुरू आहे. लवकरच परदेशातही शूटिंग सुरू होईल. सलमानचा मेव्हणा अतुल अग्निहोत्री सिनेमाची निर्मिती करतोय. सलमानचा 'भारत' हा कोरियन सिनेमा 'आॅड टू माय फादर' सिनेमाची काॅपी आहे. 1947 ते 2010पर्यंतचा काळ सिनेमात दाखवलाय. सिनेमात सलमानचा वेगवेगळा लूक प्राॅस्थेटिक मेकअपनं केला जाईल.
सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे. सल्लूमियाँचा डिझायनर एशले रिबेल्लोनं सलमानचा हा लूक इन्स्टाग्रामवर टाकलाय. सलमानचा रेस 3 तुम्ही पाहिला असालच. मग 'भारत'मधला सलमानचा लूक या 'रेस 3'मधल्या लूकशी मिळताजुळता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ali abbas khan, Bharat, Kareena Kapoor, Salman khan, अली अब्बास खान, करिना कपूर, भारत, सलमान खान