जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / माधुरी दीक्षितला येतेय पती आणि मुलांची आठवण

माधुरी दीक्षितला येतेय पती आणि मुलांची आठवण

माधुरी दीक्षितला येतेय पती आणि मुलांची आठवण

तिचे पती डाॅ. श्रीराम नेने आणि दोन मुलं परदेशात सुट्टी एंजाॅय करायला गेलेत. माधुरीशिवाय.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 29 जुलै : माधुरी दीक्षित हल्ली जाम म्हणजे जामच बिझी आहे. आणि नसायला का नाही? पहिला मराठी सिनेमा बकेट लिस्टच्या प्रमोशनसाठी किती धावपळ करावी लागली. किती मुलाखती न् काय काय. शिवाय सध्या ती मराठी सिनेमाची निर्मिती करतेय. डान्स दिवाने या रिअॅलिटी शोची ती जज आहे. शिवाय जाहिराती सुरू आहेतच. माधुरीनं भारतात आपलं पुन्हा एकदा बस्तान बसवलं पण ती तिच्या कुटुंबासाठी अजिबात वेळ देऊ शकत नाहीय. आणि याचं तिला वाईट वाटतेय. तिचे पती डाॅ. श्रीराम नेने आणि दोन मुलं परदेशात सुट्टी एंजाॅय करायला गेलेत. माधुरीशिवाय. माधुरीनं तिघांचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकलाय. आणि आपण किती हे सर्व ‘मिस’ करतोय, असं त्याखाली लिहिलंय. मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि त्यांना बाहेर फिरायला जायचं होतं. शूटिंगमुळे माधुरीला तर शक्य नव्हतं. मग तिनं आपले पती आणि मुलांना फिरून या सांगितलं. पण त्यांचे फोटोज पाहून मात्र तिला चुकल्यासारखं होतंय.

    जाहिरात

    ती या तिघांसोबत रोज व्हिडिओ चॅट करतेय. हल्ली इतकी अॅप निघालीयत, की दूरवरची माणसंही संपर्कात राहू शकतात. पण त्यांचा सहवास मिळत नाहीय. माधुरी दीक्षितच्या कलंक सिनेमाचं शूटिंगही सुरू आहे. कलंकमध्ये ती संजय दत्तबरोबर दिसणार आहे. माधुरी दीक्षित आणि संजय दत्तचा सिनेमा कलंकबद्दल खूप उत्सुकता आहे. अर्थात, माधुरी कुठल्या भूमिकेत असेल याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात होतेच. पण आता माधुरीच्या भूमिकेबद्दल कळलंय. कलंकमध्ये माधुरी वेश्येच्या भूमिकेत आहे. शिवाय ती कथ्थक नृत्यांगनाही आहे. देवदासमध्ये माधुरी दीक्षितनं वेश्या साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा ती अशाच भूमिकेत दिसणार आहे. कलंक हा पीरियड ड्रामा आहे. त्यात संजय दत्त राजाच्या भूमिकेत असेल. माधुरी आणि संजय दत्त २५ वर्षांनी सिनेमात एकत्र काम करतायत. याशिवाय सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांच्याही भूमिका आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात