मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khanची इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण: या खास दिवशी केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'हे' असणार नाव

Salman Khanची इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण: या खास दिवशी केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'हे' असणार नाव

बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच अभिनेता सलमान खान कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नुकतंच शुक्रवारी सलमाननं इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे पूर्ण केली आहेत.

बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच अभिनेता सलमान खान कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नुकतंच शुक्रवारी सलमाननं इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे पूर्ण केली आहेत.

बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच अभिनेता सलमान खान कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नुकतंच शुक्रवारी सलमाननं इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे पूर्ण केली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजेच अभिनेता सलमान खान कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. नुकतंच शुक्रवारी सलमाननं इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे सध्या त्याच्यावर खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीमध्ये 34 वर्षे झाल्याच्य खास प्रसंगी सलमाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यामध्ये सलमाननचा लुकही काही वेगळा पहायला मिळतोय.

सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सलमान लांबलचक केसांमध्ये पहायला मिळतोय. या व्हिडीओवर लिहिलंय की, '34 वर्षांपूर्वी होता आणि आता 34 वर्षांनंतर आता आहे, माझ्या आयुष्याचा प्रवास कोठूनही सुरू झाला असला तरी, 2 शब्दांचा बनला आहे. तेव्हा आणि आता माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद'.

हेही वाचा -  Prateik Babbar: स्मिता पाटील यांचा लेक पुन्हा प्रेमात; याआधी सान्या सागरसोबत केलंय लग्न

सलमानने शेअर केलेल्या व्हिडीओमधून जाहीर केले की त्याच्या 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाचे नाव बदलून 'किसी का भाई.. किसी की जान' असे करण्यात आले आहे. इंडस्ट्रीमध्ये 34 पूर्ण झाल्याच्या आनंदात त्यांनं ही घोषणा कोली आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरपूर पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, 'भाईजान पुन्हा एकदा अॅक्शनचे वादळ आणणार आहे आणि तेही त्यांच्याच स्टाइलमध्ये'.

दरम्यान, सलमानने 26 ऑगस्ट 1988 रोजी 'बीवी हो तो ऐसी' मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सलमानसाठी ही एक छोटी भूमिका असली तरी, त्याने त्यानंतर अनेक सुपरहिट दिले आगेत. त्यानं इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची एक वेगळी अशी छाप सोडली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये, या सुपरस्टारने प्रेम, समीर, राधे आणि चुलबुल पांडे यांसारख्या अनेक लोकप्रिय भूमिका साकरल्या आहेत. आता तो लवकरच 'किसी का भाई.. किसी की जान' या चित्रपटात झळकरणार आहे. हा चित्रपट 2014 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट 'वीरम'चा रिमेक आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Salman khan, Social media, Upcoming movie