मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khan Birthday: भाईजानने भाची आयातसोबत साजार केला वाढदिवस,VIDEO

Salman Khan Birthday: भाईजानने भाची आयातसोबत साजार केला वाढदिवस,VIDEO

Salman Khan Birthday

Salman Khan Birthday

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज 56 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 27 डिसेंबर: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा (Salman Khan)आज 56 वा वाढदिवस. 27 डिसेंबर 1965 इंदौर येथे सलमानचा जन्म झाला. गेली 33 वर्ष सलमान अभिनय क्षेत्रात काम करत आहे. सलमाननं 1988 मध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या तो ‘बिग बॉस 15’ चे होस्टिंग करताना दिसत आहे. दरम्यान, सलमानच्या बर्थ डे पार्टीच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्ये तो लाडकी भाची आयातसोबत केक कट करत आहे.

रविवारी रात्री त्याने पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक मोठे कलाकार सहभागी होते. त्याच्या या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ग्रँड पार्टी होताना दिसत आहे. चित्रपट लेखक मुश्ताक शेख यांनी भाईजानच्या पार्टीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

यामध्ये तुम्हाला युनिकॉर्न आणि गुलाबी रंग दिसत होता. सलमानने त्याचा वाढदिवस त्याची भाची आयतसोबत शेअर केला. आयत ही सलमान खानची बहीण अर्पिता आणि आयुष शर्मा यांची धाकटी मुलगी आहे. दोघे एकत्र केक कापतानाही दिसले.

Salman

पार्टीमध्ये क्यूट कपल देशमुखही सहभागी

सल्लूमियाच्या या पार्टीमध्ये बी टाऊनमध्ये क्यूट कपल म्हणून ओळखली जाणारी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हेदेखील सहभागी झाले होते. रितेशने फनी इंस्टा फिल्टरसोबत पार्टीच्या लोकेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो सलमानच्या पहिल्या चित्रपटासंदर्भात बोलताना दिसत आहे.

Ritiesh

सलमान राजकारणी राहुल नारायण कनाल आणि सलमानचा पार्टनर आणि पर्सनल बॉडीगार्ड शेरासोबत पोज देताना दिसला.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Entertainment, Riteish Deshmukh, Salman khan