बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या डेटिंगच्या बातम्या येतच असतात. सलमान खान-ऐश्वर्या राय पासून ते सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी पर्यंत, बॉलीवूडमध्ये अशी अनेक नावं आहेत, ज्यांच्या प्रेमकथांनी काही काळ गाजवला आणि नंतर त्यांच्या ब्रेकअपने लोकांमध्ये खळबळ निर्माण झाली. (सर्व फोटो क्रेडिट- Viral Bhayani)
या पार्टीत अनेक आजी-माजी प्रेमी आपल्या नव्या जोडीदारांसह पोहोचले आणि अनेकांनी करणच्या पार्टीत एकट्यानेही सहभाग घेतला.
रणवीर सिंह जेव्हा या पार्टीत पोहोचला, तेव्हा त्याचा सामना त्याची एक्स-गर्लफ्रेंड अनुष्का शर्माशी झाला. 'बँड बाजा बारात' चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. (सर्व फोटो क्रेडिट- Viral Bhayani)
ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या प्रेमकथा आणि त्यांच्या ब्रेकअपच्या किस्से कोणाला माहीत नाहीत? या पार्टीत दोघेही अनेक वर्षांनंतर समोरासमोर आले. ऐश्वर्या तिचा पती अभिषेक बच्चनसोबत पोहोचली. तर, सलमान या पार्टीत एकटाच एन्ट्री करताना दिसला.
करीना कपूर खान आणि शाहिद कपूरही अनेक वर्षांनंतर पार्टीत आमनेसामने आले. दोघेही त्यांचे जोडीदार सैफ अली खान आणि मीरा राजपूत यांच्यासोबत आले होते.
सलमान खान आणि कॅटरिना कैफही आमनेसामने आले होते. मात्र, या दोघांनी कधीही आपलं नातं सार्वजनिक केलं नाही. पण चाहत्यांना अंदाज होता की, दोघांमध्ये काहीतरी खास आहे. मात्र, सलमान आणि कॅटरिना अजूनही एकमेकांना चांगले मित्र म्हणवतात.
करण जोहरच्या या पार्टीत बॉलिवूडचे एक्स कपल हृतिक रोशन आणि सुझैन खान सहभागी झाले होते. दोघेही जण त्यांच्या नवीन जोडीदारासह पार्टीत पोहोचले होते. हृतिक आणि सबा आझाद सोबत पार्टीत पोहोचले. सुझैन तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत पार्टीत सहभागी झाली होती.
करणच्या बर्थडे पार्टीला ईशान खट्टरची एक्स गर्लफ्रेंड अनन्या पांडेही पोहोचली होती. दोघांचं नुकतंच ब्रेकअप झालंय.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्यांदरम्यान, त्यांनीही या पार्टीला हजेरी लावली. इथे दोघे समोरासमोर आले.
घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकदा एकत्र दिसले. त्यांनी घटस्फोट घेतल्याची घोषणा करतानाही आपण यापुढे मित्र राहू असं म्हटलं होतं.