मुंबई 11 जुलै**:** विनोदवीर कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) हा सेलिब्रिटींची फिरकी घेण्यात पटाईत आहे. त्याच्या शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकाराची तो पोलखोल करताना दिसतो. अगदी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) देखील सोडलं नाही. त्याच्याबद्दल अशी गोष्ट जाहीर केली की सलमानला लाजेनं आपलं तोडं लपवावं लागलं. (Salman Khan Video viral) सलमानचा हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सलमाननं भाऊ अरबाज आणि सोहेलसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. दरम्यान या शोमध्ये सलीम खान यांनी एण्ट्री घेत खान बंधुंना आश्चर्याचा धक्का दिला. याच वेळी कपिलनं सलीम यांना तिघांचे बालपणीचे किस्से सांगण्यासाठी प्रवृत्त केलं. मग त्यांनी देखील असा एक किस्सा सांगितला की ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ‘मुलीपण अशा नाचतात का?’ भाग्यश्रीचा मॉर्निंग डान्स पाहून फॅन्स झाले क्रेझी
Jab Kapil ke ghar aayi Khan family, dekhiye kiss kiss ki pol khul gayi! #TheKapilSharmaShow, 29 Dec se, har Sat-Sun raat 9:30 baje. @BeingSalmanKhan @SohailKhan @arbaazSkhan @KapilSharmaK9 @kikusharda @haanjichandan @Krushna_KAS @bharti_lalli @sumona24 @RochelleMRao @trulyedward pic.twitter.com/Aux3E7bXXg
— sonytv (@SonyTV) December 26, 2018
काजोलमुळे संपलं तनिशा मुखर्जीचं करिअर? सांगितलं बॉलिवूडमधून गायब होण्याचं कारण सलमान आणि त्याचे भाऊ लहान असताना वडिलांपेक्षा गणेश नावाच्या एका व्यक्तीला अधिक मान देत असतं. गणेश घरी येताच त्याच्यासाठी चहा, पाणी, सरबत घेऊन यायचे. वडिलांची खुर्ची त्याला बसायला द्यायचे. “घरात माझ्यापेक्षा अधिक मान त्यालाच दिला जायचा. त्याची होणारी सेवा पाहून घर माझं आहे की त्याचं असा प्रश्न मला पडायचा” असं सलीम खान म्हणाले. अर्थात यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलं. गणेश हा सलमानच्या शाळेत काम करायचा. परिक्षेचे पेपर लीक होताच तो सर्वप्रथम सलमानला द्यायचा. त्यामुळे सलमान आणि त्याचे भाऊ वडिलांपेक्षा अधिक आदर गणेशचा करायचे. हा किस्सा ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.