जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'रंग माझा वेगळा' फेम साईशा ज्यांना भेटते त्यांच्याबरोबर करते असं काही; अभिनेत्री बरोबरचा तो VIDEOव्हायरल

'रंग माझा वेगळा' फेम साईशा ज्यांना भेटते त्यांच्याबरोबर करते असं काही; अभिनेत्री बरोबरचा तो VIDEOव्हायरल

'रंग माझा वेगळा' फेम साईशा ज्यांना भेटते त्यांच्याबरोबर करते असं काही; अभिनेत्री बरोबरचा तो VIDEOव्हायरल

झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत साईशानं एंट्री घेतली आहे. नव्या मालिकेच्या सेटवरही साईशा चांगलीच धु़डगूस घालत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै: स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून  प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली बालकलाकार म्हणजे साईश भोईर. मालिकेत तिनं कार्तिकीची भूमिका साकारली होती. मात्र अल्पावधीतच साईशानं मालिकेतून एक्झिट घेतली. साईशा आता मालिकेत काम करणान नाही का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला असताना साईशा भोईरची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत साईशानं एंट्री घेतली आहे. नव्या मालिकेच्या सेटवरही साईशा चांगलीच धु़डगूस घालत आहे. साईशा फार मस्तीखोर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र ती ज्यांना भेटते त्यांच्याबरोबर काय करते हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साईशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात ती अभिनेत्री अनिता दातेच्या मांडीवर बसली आहे. अनिता दातेला त्रास देण्याचं काम साईशा करताना दिसत आहे. अनिता दातेही तिच्याबरोबर चांगलीच मस्ती करताना दिसत आहे. ‘आम्ही ज्यांना भेटतो त्यांना आपल्यासारखं बनवून टाकतो’, असं म्हणत साईच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हेही वाचा - Tamasha Live: जेव्हा सोनाली दाजींना papsसाठी पोझ करायला शिकवते; पाहा क्युट VIDEO! अभिनेत्री अनिता दाते आणि साईशाचा हा ग्रीन रुममधील मस्ती करतानाचा व्हिडीओ पाहून अभिनेत्री श्रृती मराठीनं ‘मॅड गर्ल’, असं म्हणतं कमेंट केली आहे.  तर एका युझरनं ‘ये कोनसा गेम है?’, असा प्रश्न विचारला आहे.

जाहिरात

साईशानं रंग माझा वेगळा मालिका सोडल्यानंतर तिच्या आई वडिलांनी व्हिडीओ शेअर करत साईशाची शाळा सुरू होत असून तिला शुटींग जमत नाहीये. त्याचप्रमाणे साईशानं देखील मला शुटींगचा कंटाळा आला असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर साईशा नव्या मालिकेतून समोर आली आहे. हे असं कसं झालं? असा प्रश्न नेटकरी सध्या विचारत आहेत. नवा गडी नवं राज्य या झी मराठीवरील नव्या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते, पल्लवी पाटील, कश्यप परुळेकर मुख्य भूमिकेत आहे. पुर्नजन्म या विषयावर आधारित ही मालिका असल्याचं समोर येत आहे.  साईशा या मालिकेत रमाच्या मुलीचं पात्र साकारत आहे. रमा या जगात नाही असं दाखवण्यात आलं आहे. नव्या विषयाची ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात