31 जानेवारी : 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू एका नव्या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मकरंद माने यांच्या 'कागर' सिनेमात रिंकू मुख्य भूमिकेत झळकणारे. नुकतंच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आलीये.
अकलूजमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू असल्याने रिंकूला बघायला चांगलीच गर्दीसुद्धा जमली होती. आता खऱ्या अर्थाने 'कागर' सिनेमाची अॅक्शन सुरु झालीये. एवढंच नव्हे तर रिंकूच्या या नव्या सिनेमाविषयी चाहत्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळतेय.
'सैराट'मुळे रिंकू घराघरात पोचली. कमी वयात तिला ही लोकप्रियता मिळालीय. आता 'कागर'मुळे ही लोकप्रियता किती वाढतेय, हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Archi, Kagar, Rinku rajguru