मुंबई, 10 फेब्रुवारी : रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘सैराट’ (Sairat) या सुपरहिट चित्रपटातून लोकप्रिय झालेली रिंकू (rinku rajguru instagram story) अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ऑनलाई पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील ती अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (Riku Instagram photos) रिंकू उर्फ आर्चीनं पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.
“लोभ नियंत्रणात ठेवणं हिच खरी संपत्ती आहे.” अशा आशयाची कॉमेंट करत रिंकूनं आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोमधील तिचं सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी रिंकूच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सैराट चित्रपटातून नावारुपास आलेल्या आर्चीनं अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावलं. तिच्या अभिनयामुळे ती स्टार झाली. महाराष्ट्रात बुलेट चालवणाऱ्या आर्चीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळात आहे. सैराटसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आलं. सैराटच्या यशानंतर रिंकू भरपूर चित्रपटांमध्ये करेल असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तिने आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं. हल्ली ती आपली शैक्षणिक जबाबदारी सांभाळून ती चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते.