मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सैराट फेम प्रिन्सची 6 तास पोलीस चौकशी; लवकरच होणार अटक?

सैराट फेम प्रिन्सची 6 तास पोलीस चौकशी; लवकरच होणार अटक?

सैराट फेम प्रिन्स अर्थातच अभिनेता सूरज पवार चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

सैराट फेम प्रिन्स अर्थातच अभिनेता सूरज पवार चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

सैराट फेम प्रिन्स अर्थातच अभिनेता सूरज पवार चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

रिपोर्टर- हरीश दिमोटे

मुंबई, 24 सप्टेंबर-  सैराट फेम प्रिन्स अर्थातच अभिनेता सूरज पवार चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला होता. आर्थिक फसवणूक प्रकरणात सुरज पवारची चौकशी करण्यात आली आहे. मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमीष देवून पैशाची लुट करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुरज पवारचाही सहभाग असल्याचा पोलीसांना संशय आहे. 15 सप्टेंबर रोजी हा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत चार आरोपी पोलीसांच्या ताब्यात आले आहेत. काल सहा तास सुरजची कसून चौकशी करण्यात आली.सोमवारी सुरजला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर गुन्ह्यात सहभाग आढळ्यास सुरज पवारला अटक होणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केलंय. हे एक मोठं रॅकेट सुरु असल्याची माहिती समोर आली होती. एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं होतं. हा अभिनेता दुसरा कुणी नसून 'सैराट' फेम प्रिन्स अर्थातच सुरज पवार आहे. सध्या प्रिन्सची चौकशी केली जात आहे. काल सलग सहा तास ही चौकशी झाली. पुन्हा सोमवारीही त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रिन्स दोषी आढळल्यास राहुरीचे पोलीस लवकरच त्याच्या मुसक्या आवळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कुणी दिली तक्रार?

या प्रकरणामध्ये नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी दाखल तक्रार केली होती. वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (राहणार नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हे वाचा:Alka Kubal : 'ऑनस्क्रिन सोशिक असल्या तरी प्रत्यक्ष मात्र...'; मिलिंद गवळींनी केला अलका ताईंबाबत मोठा खुलासा )

प्रिन्सचा गुन्हा नेमका काय?

सैराट चित्रपटात ज्याने आर्चीचा भाऊ म्हणजे प्रिन्स म्हणून काम केले, तो प्रिन्स देखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हाला कामासाठी हे शिक्के लागतात असे सांगून नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून दिल्याचे आरोपीनी सांगितले आहे. आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा गौरवापर केला आहे. म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो. त्यामुळे खरच दोषी आढळल्यास राहुरी पोलीस लवकरच सैराटचा प्रिन्स सेलिब्रेटी सुरज पवार याच्या मुसक्या आवळून गजाआड करणार आहेत. पुढील तपास पोनि प्रताप दराडे,उपनिरीक्षक सज्जन नऱ्हेडा, शिपाइ गणेश,लिंपणे,शशी वाघमारे करीत आहेत.नोकरीचे आमिष दाखवून कुणाची फसवणूक झाली असेल तर अशा तरुणांनी न घाबरता राहुरी पोलिसांशी संपर्क करावा.भविष्यात आपल्याला नोकरीत अडचण येईल हा समज पूर्णपणे खोटा असल्याने फसवणूक झालेल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन वरिष्ठ पोनि प्रताप दाराडे यांनी केले आहे.

First published:

Tags: Crime, Marathi cinema, Marathi entertainment