जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akash Thosar : धबधब्याच्या काठीच परश्यानं मांडली चूल; निसर्गाच्या सानिध्यात बनवली गरमागरम भजी

Akash Thosar : धबधब्याच्या काठीच परश्यानं मांडली चूल; निसर्गाच्या सानिध्यात बनवली गरमागरम भजी

आकाश ठोसर

आकाश ठोसर

आकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्याची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. अशातच आता आकाशने पोस्ट केलेला एक व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै : पहिल्याच चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीत हिट झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. त्याने सैराट या चित्रपटात परश्या ही भूमिका साकारून महाराष्ट्राच्या घराघरात ओळख मिळवली. प्रेक्षकांनी त्याला आपल्या मनात विशेष स्थान दिलं. सैराट नंतर आकाशने अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी आजही त्याला अनेकजण परश्या म्हणूनच ओळखतात. आकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्याची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. अशातच आता आकाशने पोस्ट केलेला एक व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. मराठमोळ्या आकाश ठोसरला भटकंतीची खूप आवड आहे. तो अनेकदा त्याच्या कामातून वेळ काढून भटकंती करताना दिसतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर करतो. सध्या आकाश सह्याद्रीची भटकंती करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सह्याद्रीतील धबधब्याचा व्हिडीओ चर्चेत आला होता. आकाशने सह्याद्रीच्या धबधब्यात Waterfall Rappelling हा खतरनाक स्टंट केला. चाहत्यांनी त्याचा हा व्हिडिओ पाहून कौतुक केलं होतं. आकाशने आता याच सहलीतील पुढचा व्हिडीओ शेअर केला आहे. काय म्हणता आदित्य रॉय कपूर लवकरच लग्न करणार? अनन्या पांडेसोबत डेटींगची चर्चा अन् अभिनेत्यानं लग्नाच्या प्रश्नावर दिलं असं उत्तर या व्हिडिओत आकाश कुठलीही स्टंटबाजी करत नसून त्याने निर्सर्गाच्या सानिध्यात चक्क चूल मांडली आहे. आकाश या व्हिडिओमध्ये सगळ्यांसाठी चक्क गरमागरम भजी बनवताना दिसतो आहे. आकाशने हा व्हिडीओ पोस्ट करत ‘सुख…’ असं म्हटलं आहे. या व्हिडिओत आकाशने धबधब्याच्या काठीच एक छोटी शेगडी पेटवली, त्यावर पातेलं ठेवून तेल गरम केलं आणि चक्क त्यात बटाटा भजी तळली आणि सगळ्यांना खाऊ घातली. आकाशच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे.

जाहिरात

‘सह्याद्री आणि आकाश ठोसर’, ‘#मराठी Bear Grylls’,  ‘अरे घरीचं बनवून खायचे उगाच पावसात कशाला धरपड करायची’, ‘भावा जपली रे तूच संस्कृती’ अशा कमेंट करत चाहत्यांनी आकाशचं कौतुक केलं आहे. आकाशचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आकाशनं मराठीशिवाय हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.  आकाशच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर काही दिवसांपूर्वीच तो नागराज मंजुळे यांच्या ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता आकाश एका ऐतिहासिक चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आकाश लवकरच बाळ शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे. “लहान असो वा मोठा वाघ ‘वाघच’ असतो” महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळादिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा ‘बाल शिवाजी’ या महाचित्रपटाचे पहिले पोस्टर.’ असं म्हणत आकाशने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आकाशला आता शिवरायांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात