जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘तू जेष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोना लस घेतल्यामुळं सैफ अली खान होतोय ट्रोल

‘तू जेष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोना लस घेतल्यामुळं सैफ अली खान होतोय ट्रोल

‘तू जेष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोना लस घेतल्यामुळं सैफ अली खान होतोय ट्रोल

60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण होत आहे. तसंच 45 ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण केलं जात आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यानं देखील लस घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 6 मार्च: कोरोना विषाणूचं (COVID 19 vaccine) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण होत आहे. तसंच 45 ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचंही लसीकरण केलं जात आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यानं देखील लस घेतली. मात्र यामुळं त्याला आता सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. तू ज्येष्ठ नागरिक आहेस का? असं म्हणत त्याची खिल्ली उडवली जात आहे. सैफ अली खाननं बिकेसीमधील कोव्हिड वॅक्सिन सेंटरमध्ये जाऊन लस घेतली. यावेळचे व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायल झाले. मात्र हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. “तुला कशी लस मिळाली, तू देखील जेष्ठ नागरिक झालास का? सेलिब्रिटींसाठी सरकार नियम मोडत आहे का?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत टीकाकार सध्या सैफला ट्रोल करत आहेत.

जाहिरात

लसीकरणाचा तिसरा टप्पा पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही लशीकरणास सुरुवात झाली आहे. शासकीय रुग्णालयात लसीकरण मोफत असून खासगी रुग्णालयांत लशीकरणासाठी कमाल अडीचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अवश्य पाहा - ‘पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया’; Covid Vaccine घेत कमल हासन यांचा टोला

null

ओळखपत्र बंधनकारक सहआजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून प्रमाणित केलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. तर 60 वर्षांवरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पुरावा (कार्यालयीन, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र इ.) सादर करणं आवश्यक आहे. ‘कोव्हिड डिजिटल प्लॅटफॉर्म’ हा 1 मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून खुला करण्यात आला आहे. मात्र पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरळीत होईपर्यत नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असेही आवाहन पालिकेनं केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात