PM Care Fund नाही तर या संस्थांना केली सैफ अली खान आणि करीना कपूरने मदत

PM Care Fund नाही तर या संस्थांना केली सैफ अली खान आणि करीना कपूरने मदत

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने पीएम केअर फंडमध्ये डोनेट करण्याबाबत पोस्ट केली होती. दरम्यान सैफीनाने इतर महत्त्वाच्या संस्थांना कोरोनाच्या लढ्यासाठी मदत केली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : बॉलीवुडमधील प्रसिद्ध कपल करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी देखील कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी या लढाईत त्यांचं सहकार्य दाखवलं आहे. करीनाने यूनिसेफ (UNICEF), गिव्ह इंडिया (GIVE INDIA) आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्‍यूजला (IAHV) सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. करीनाने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. मात्र बॉलिवूडमधील अनेक कलाकार पीएम केअर फंडमध्ये डोनेशन करत आहेत. त्याबाबत करीनाने या पोस्टमध्ये काही नमूद केलेलं नाही.

(हे वाचा-अक्षय-कार्तिकनंतर आता विकी कौशलनंही PM-Cares फंडमध्ये दान केली मोठी रक्कम)

करीनाने तिच्या इन्स्‍टाग्रामवर म्हटलं आहे की, 'संकटाच्या या काळात आपणा सर्वांना पुढे येऊन मदत करणं गरजेचं आहे. आम्ही दोघांनी यूनिसेफ (UNICEF), गिव्ह इंडिया (GIVE INDIA) आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्‍यूजला (IAHV) सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्र आपण पुढे जाऊ. जय हिंद. करीना, सैफ आणि तैमुर.'

View this post on Instagram

 

🙏🏻

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

काही वेळापूर्वी सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने पीएम केअर फंडमध्ये डोनेट करण्याबाबत पोस्ट केली होती. दरम्यान तिने सुद्धा किती रक्कम ती दान करणार आहे, याबाबत गुप्तता राखली आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पीएम केअर फंडमध्ये मदत केली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मोठा हातभार मिळणार आहे. कोरोनाच्या या लढ्यात अनेक उद्योगपतींनी सुद्धा कोट्यवधींची मदत केली आहे.

First published: March 31, 2020, 6:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading