मुंबई, 22 ऑक्टोबर- मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखलं जातं. सईने मराठी चित्रपट, नाटक,हिंदी चित्रपट वेबसीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उठवला आहे.आज सईला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीय. सई ताह्मणकरची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. तिच्या चाहत्यांना तिला पडद्यावर पाहण्याची प्रचंड उत्सुकता असते. इतकंच नव्हे तर तिच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. सईसुद्धा नेहमीच आपल्या प्रत्येक अपडेट्स चाहत्यांना देत असते. शिवाय ती प्रत्येक मुलाखतींमध्ये आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत बिनधास्त गप्पा मारत असते. आज आपण सईबाबत असंच काहीसं जाणून घेणार आहोत, जे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सई ताम्हणकर ही आजच्या तरुण पिढीची आवडती नायिका आहे. गोड आणि सुंदर सई ताम्हणकरचा मोठा चाहतावर्ग आहे. सईला पाहिल्यानंतर अनेक लोक तिच्या प्रेमात पडतात. परंतु जेव्हा एका मुलखतीमध्ये जेव्हा सईला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिनेत्रीने दिलेलं उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सई ताह्मणकरने काही दिवसांपूर्वी एका मराठी युट्युब चॅनेलला मुलखात दिली होती. या मुलाखतीदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुला कधी कोणी प्रपोज केलं आहे का? यावर सईने दिलेलं उत्तर सर्वांनाच चकित करणारं होतं. या प्रश्नावर उत्तर देत सईने सांगितलं की, तिला कॉलेजमध्य असताना कधीच कोणी प्रपोज नाही केलं. याचं कारणही यावेळी सईने सांगितलं.
(हे वाचा:Sayali sanjeev : अबब! सायली संजीवने आतापर्यंत 'एवढ्या' मुलांना केलंय प्रपोज; अभिनेत्रीचा मोठा खुलासा )
सईने यामागचं कारण सांगत म्हटलं की, ती कॉलेजमध्ये असताना एक राज्य स्तरीय कब्बडीपटू होती. ती कॉलेजमध्येसुद्धा अतिशय डॅशिंग होती. त्यामुळे सर्व मुले तिला घाबरत होते. आणि सर्व मुले घाबरत असल्यामुळे तिला कधीच कोणी प्रपोज करण्याचं धाडस नाही केलं. सई ताह्मणकरने यावेळी कॉलेजमध्ये केलेल्या धम्माल मस्तीबाबतही दिलखुलास गप्पा मारल्या. यादरम्यान सईने सांगितलं की, एका स्टेशनवर काही टवाळखोर मुलांनी त्याची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सईने अगदी डॅशिंगपणे त्यांचा सामना केला होता. आणि त्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी त्यांना चांगलाच चोप दिला होता.
सई ताम्हणकर ही मूळची सांगलीची आहे. कॉलेजमध्ये असताना ती क्रीडा क्षेत्रात सक्रिय होती. सई एक राज्य स्तरीय कब्बडीपटू होती. तसेच कराटेसारख्या खेळातही पारंगत होती. सई ताह्मणकर कॉलेजमध्ये असताना नाटक स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. तिने सुरुवातीपासून अभिनय क्षेत्रात येण्याचं ठरवलं नसल्याचंही ती सांगते. सईने आपलं अभिनय क्षेत्रात अपघाताने येणं झाल्याचं ती सांगते. सईने आज मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच 'मिमी' या हिंदी चित्रपटासाठी सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात ती अभिनेत्री क्रिती सेनन होती. यामध्ये सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या लुकसोबत नवनवीन एक्सपिरिमेंट करत असते. सई नेहमीच ट्रॅडिशनल आणि वेस्टर्न अंदाजात फोटोशूट करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. सई अलीकडे मराठी-हिंदी चित्रपट तसेच वेबसीरिजमध्येही आपली छाप पाडत आहे. त्याचबरोबर छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये सई ताम्हणकर परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात सईसोबत मराठी अभिनेता प्रसाद ओकसुद्धा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sai tamhankar