मुंबई, 22 ऑक्टोबर : मराठीतील गुणी अभिनेत्री असं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा सायली संजीवचं नाव समोर येईल. मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या सायलीने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट, वेब स्टोरीज अशा सगळ्या माध्यमांत तिने काम केलं आहे. सायली लवकरच ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती थोरल्या राणीसाहेब म्हणजेच सईबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ती कायमच चर्चेत राहते. आता तिने याबद्दलच मोठा खुलासा केला आहे. नुकतच सायलीने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिच्यासोबत अभिनेता शरद केळकर सुद्धा होता. सुबोध भावेचे प्रश्न आणि सायलीच्या धमाल उत्तरांनी कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. या कार्यक्रमात एका सेगमेंटमध्ये सायलीला प्रपोज करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने कॉलेजमधील एक गमतीशीर किस्सा सांगितला. कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली, ‘मी बरीच स्पष्टवक्ती आहे. म्हणजे जे मनाला पटेल ते मी पटकन बोलते. मी लाजत नाही म्हणुनच तर मी कॉलेजमध्ये असताना मुलांना स्वतःहून प्रपोज केलं होतं. असा किस्सा तिने सांगितलं. हेही वाचा - Bus Bai Bus: सकाळी उठल्या उठल्या सायली संजीवला लागते ही गोष्ट, अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा पुढे याबाबत बोलताना सायली म्हणाली, ’’ म्हणजे खूप मुलं नाही पण २ ते ३ जणांना. पण ते सुद्धा तेव्हा मला नाहीच म्हणाले. त्यांनी मला तेव्हा नकार दिला. आता जर ते टीव्ही पाहत असतील तर त्यांना आठवेल. हा एपिसोड पाहून त्यांना आठवेल ही तीच आहे.’’
यानंतर मात्र सुबोध आणि शरद केळकरने तिची चांगलीच मजा घेतली. सुबोध तिला म्हणाला कि, ’’ ‘त्यांनी तुला काय म्हणत नकार दिला की जा आणि थोडी मोठी होऊन ये?’ यावर उत्तर देत शरद म्हणतो, ‘ती आताही शाळेतच आहे पण तुला नकार देणारी मुलं किती कमनशिबी असतील.’ मात्र सायलीच्या या खुलाशाने तिथे उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
झी मराठी वाहिनीवर अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेला कार्यक्रम म्हणजे ‘बस बाई बस’. खास महिलांसाठी असलेल्या या कार्यक्रमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची हजेरी पहायला मिळाली आहे. या कार्यक्रमातून पाहुण्यांविषयी अनेक गोष्टी समोर येतात. सुबोध भावे प्रत्येक पाहुण्यांवर प्रश्नांचा भडिमार करत असतात. अशातच कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेत्री सायली संजीव हजेरी लावणार आहे. या एपिसोडचे प्रोमो सध्या गाजतायत. त्यामुळे पूर्ण भाग पाहायला प्रेक्षकांना मजा येईल यात शंका नाही.