मुंबई, 6 एप्रिल- मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी सई ताम्हणकर ची ओळख आहे. सईने फक्त मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. सईने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्रीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मात्र फारच कमी लोकांना सईच्या खाजगी आयुष्याबाबत माहिती असेल. खऱ्या आयुष्यात सईचं लग्न झालं होतं. मात्र काही दिवसांतच तिचा घटस्फोटदेखील झाला होता. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत. सई ताम्हणकर आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या लव्हलाईफमुळेही प्रचंड चर्चेत असते. सध्या सई ताम्हणकर निर्माता अनिश जोगला डेट करत आहे. या दोघांनीही सोशल मीडियावर आपलं नातं अधिकृत केलं आहे. सई आणि अनिश सतत सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत एकमेकांना प्रोत्साहन देत असतात, तसेच रोमँटिकदेखील होत असतात. मात्र एकेकाळी सई ताम्हणकरने आपल्या आयुष्यात कठीण काळ पाहिला आहे. सई प्रेम, लग्न या गोष्टींपासून अंतर बनवलं होतं. कारण या काळात अभिनेत्रीचा घटस्फोट झाला होता. (हे वाचा: Maharashtrachi Hasyajatra: वनिता खरातनंतर शिवाली परबचं लग्न? ‘या’ अभिनेत्यासोबत पोहोचली डेटवर ) कोण आहे सईचा एक्स-पती? सई ताम्हणकरने अमेय गोसावी या व्यक्तीशी लग्न केलं होतं. अमेय हा मूळचा पुण्याचा आहे. तर सई ताम्हणकर सांगलीची आहे. अमेय हा व्यवसायाने एक निर्माता आहे. त्याची लोडींग पिक्चर्स नावाची एक निर्मिती संस्था आहे. विशेष म्हणजे सई आणि अमेयने कधीही एकत्र काम केलेलं नाहीय. मात्र तरीसुद्धा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. असं म्हटलं जातं की, या रिलेशनशिपमध्ये सईनेच पुढाकार घेतला होता. तब्बल ३ वर्षांच्या डेटिंगनंतर या दोघांनी लग्न कल होतं. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सई ताम्हणकर आणि अमेय गोसावीने सन 2013 मध्ये लग्नगाठ बांधत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. तत्पूर्वी या दोघांनी 2012 मध्ये साखरपुडा उरकला होता. मात्र कामाच्या व्यापामुळे या दोघांच्या लग्नाला एक वर्ष विलंब झाला होता. सईचं अमेयवर अतिशय प्रेम होतं. म्हणूनच तिने आपल्या खांद्यावर अरेबिक भाषेत दोन टॅटू काढून घेतले आहेत. यांमधील एक टॅटू त्यांच्या लग्नाची तारीख आहे. तर दुसरी अमेयने प्रपोज केलेली तारीख आहे.
लग्नाच्या दोनच वर्षात या दोघाचं एकमेकांसोबत बिनसलं होतं. एकमेकांच्या विचारात ताळमेळ बसत नसल्याने या दोघांचा घटस्फोट झाल्याचं सांगितलं जातं. एका मुलाखतीत सईने आपण आजही अमेयला भेटत असल्याचं सांगितलं होतं. तो आपला चांगला मित्र असल्याचंही म्हटलं होतं. झालेल्या घटना मनात धरुन ठेवण्यापेक्षा जय-त्यावेळी सोडून देऊन नव्याने आयुष्य जगता आलं पाहिजे असं सईचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे आजही सईच्या खांद्यावर ते टॅटू आहेत. एखाद्यावेळी खास असणारी ती गोष्ट आज लाज वाटून घेण्यात काय अर्थ आहे. जे होतं ते होतं. त्यामुळे आपण टॅटू पुसले नसल्याचेही तिने सांगितलं होतं.