'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामधून अनेक कलाकारांना एक नवी ओळख मिळाली आहे. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शिवाली परब होय. मुंबईतील शिवाली परब या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली आहे. सध्या शिवाली आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शिवाली परबने एक पोस्ट शेअर करत आपण डेटवर गेल्याचं म्हटलं आहे. या फोटोमुळे अभिनेत्री त्याला डेट करतेय का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. शिवाली आपला सहकलाकार निमिष कुलकर्णीसोबत डेटवर गेली होती. निमिष कुलकर्णी हा 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शिवालीने फोटोत शेअर करत 'डेट विथ माय निब्बा' असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे.