मुंबई, 1 सप्टेंबर- मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज अशा तिन्ही क्षेत्रात सईने दमदार कामगिरी करत आपला ठसा उमठवला आहे. नुकतंच अभिनेत्रीला आपल्या हिंदी चित्रपटासाठी फिल्मफेअरदेखील मिळाला आहे. एकीकडे सईचं तोंडभरुन कौतुक होत असताना, दुसरीकडे मात्र तिला टीकेला सामोरं जावं लागत आहे. लेखिका, उद्योजिका, प्रवक्त्या शेफाली वैद्य यांनी सईवर निशाणा साधला आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. काल घरोघरी मोठ्या जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. वातावरण अगदी प्रसन्न बनलं आहे. दरम्यान स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होत आपला आनंद साजरा करत आहेत. पारंपरिक साडी, दागिने, केसात गजरा आणि कपाळावर टिकली या लुकमध्ये स्त्रिया विवीध फोटोशूटदेखील करत आहेत. मात्र अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोला टीकेला सामोरं जावं लागत आहे. शेफाली वैद्य यांनी सई ताम्हणकरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये सईने हातात गणरायाची मूर्ती घेतली आहे. सई अगदी पारंपरिक अंदाजात तयार झाली आहे. मात्र अभिनेत्रीच्या कपाळावर टिकली दिसून येत नाहीय. याच गोष्टीवर निशाणा साधत शेफाली वैद्य यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत लिहलंय, ‘कोणती हिंदू स्त्री ही टिकली न लावता बाप्पाला घरी घेऊन येईल?’ शेफाली वैद्य यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींना त्यांना समर्थन दिलंय. तर काहींनी त्यांनाच उलट प्रश्न विचारत त्यांच्यावर टीका केलीय.
Which Maharashtrian woman brings home Shri Ganesh Murti without a bindi? @RelianceDigital? #nobindinobusiness https://t.co/GlWpAh6YI0
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) August 31, 2022
(हे वाचा: Laal Singh Chaddha Boycott: ‘जेव्हा विनाशाचं सेलिब्रेशन केलं जातं…’ अतुल कुलकर्णींचं ट्विट चर्चेत ) सई ताम्हणकरचा हा फोटो एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता. खरं तर हा जाहिरातीमधील फोटो आहे. शेफाली यांनी हाच फोटो शेअर केला आहे. दरम्यान सईच्या कामाबाबत सांगायचं तर, अभिनेत्रीला नुकतंच 67 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सईला हा पुरस्कार लक्ष्मण उतेकर यांच्या ‘मिमी’ या चित्रपटासाठी मिळाला आहे. यामध्ये अभिनेत्रीने क्रिती सेननच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.