मुंबई, 1 सप्टेंबर- प्रेक्षक सध्या बॉलिवूडवर चांगलंच नाराज असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड सुरु आहे. येणाऱ्या प्रत्येक बॉलिवूड चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरत आहे. तत्पूर्वी मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाला या ट्रेंडचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अभिनेता फारच निराश झाला आहे. दरम्यान त्याने आपलं काही चुकलं असल्यास माफीही मागतो असेही म्हटलं आहे. त्यानंतर आता मराठी अभिनेते आणि ‘लाल सिंह चड्ढा’चे पटकथा लेखक अतुल कुलकर्णी यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेंडमुळे सोशल मीडियावरील वातावरण ढवळून निघालं आहे. या ट्रेंडचा फटका आता सर्वच बॉलिवूड चित्रपटांना बसत आहे. प्रेक्षक बॉलिवूडवर अद्यापही नाराज असल्याचं दिसून येत आहे. सर्वप्रथम ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा फटका बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ड्रीम प्रोजेक्टला बसला होता. ‘लाल सिंह चड्ढा’ हा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा दिलखुलास प्रतिसाद मिळेल असा विश्वास आमिर खानला होता. परंतु असं काहीही झालं नाही. प्रेक्षकांनी आमिर खानवर रोष व्यक्त करत या चित्रपटाला बॉयकॉट केलं होतं. दरम्यान अनेक कलाकारांनी ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेंडबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. आता मराठमोळे अभिनेते आणि लाल सिंह चड्ढाचे पटकथा लेखक अतुल कुलकर्णी यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. परंतु त्यांनी यामध्ये लाल सिंह चड्ढाचा कोणताही उल्लेख केलेला नाहीय. परंतु नेटकरी ही पोस्ट लाल सिंह चड्ढाच्या अपयशाबाबत असल्याचं म्हणत आहेत. अतुल कुलकर्णी यांनी एक ट्विट करत म्हटलंय, ’ जेव्हा विनाश हा तमाशा असल्यासाखा साजरा केला जातो तेव्हा कटू सत्य मोडकळीस येतात ‘. या शब्दात त्यांनी खंत व्यक्त केलीय. त्यामुळे नेटकरी याचा संदर्भ लाल सिंह चड्ढाच्या अपयशाशी जोडत आहेत.
When destruction is celebrated as if it were a spectacle, the harsh truths are reduced to debris. #globalphenomenon
— atul kulkarni (@atul_kulkarni) August 28, 2022
(हे वाचा: Karan Johar: ‘या’ प्रसिद्ध स्टारकिडवर करण जोहर नाराज; कारण ऐकून वाटेल आश्चर्य **)** अतुल कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच ‘लाल सिंह चड्ढा’च्या माध्यमातून पटकथा लेखनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटासाठी तब्बल 180 कोटींचा खर्च आला होता. परंतु चित्रपटाने केवळ 120 कोटींची कमाई केल्याने निर्मात्यांनाही मोठा फटका बसला आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ वर ‘लाल सिंह चड्ढा’ आधारित आहे. या चित्रपटात आमिर व्यतिरिक्त करीना कपूर, नागा चैतन्य, मोना सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत.