जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sai Pallavi: रश्मिका पाठोपाठ साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' भूमिकेतून जिंकणार प्रेक्षकांचं मन

Sai Pallavi: रश्मिका पाठोपाठ साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' भूमिकेतून जिंकणार प्रेक्षकांचं मन

साई पल्लवी

साई पल्लवी

रश्मिका मंदाना, पूजा हेगडे या साऊथ सुंदरींनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतल्या नंतर आता त्या पाठोपाठ अजून एका दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे साई पल्लवी.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर :  सध्या बॉलिवूडवर दाक्षिणात्य चित्रपटांचीच चलती आहे. या चित्रपटांसोबतच दाक्षिणात्य कलाकारांचीच भारतभर हवा आहे. बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा प्रेक्षक या कलाकारांवर अधिक प्रेम करताना दिसून येत आहेत. पण या कलाकारांना देखील बॉलिवूडचा मोह आवरत नाही. रश्मिका मंदाना, पूजा हेगडे या साऊथ सुंदरींनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतल्या नंतर आता त्या पाठोपाठ अजून एका दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे साई पल्लवी. ती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचं बोललं जातंय. दाक्षिणात्य निर्माते अल्लू अरविंद यांच्या आगामी ‘रामायण’ या चित्रपटातून साई पल्लवी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये डेब्यू करणार असल्याचं म्हटलं जातंय. २०१९ साली ‘रामायण’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मात्र गेली ३ वर्ष या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता या चित्रपटात साई पल्लवीची वर्णी लागली आहे. हेही वाचा - बॉलिवूडच्या सुंदरी ज्या सांभाळतात कोट्यवधींचे बिझनेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अरविंद यांच्या ‘रामायण’ ची स्क्रिप्ट गेल्या ४ ते ५ वर्षांपासून लिहून तयार आहे. याआधी चित्रपटासाठी निर्मात्याने हृतिक रोशन, राम चरण आणि प्रभास यांच्याशी संपर्क केल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता या भूमिकेसाठी रणबीरचा विचार केला जात आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी यापूर्वी दीपिका पदुकोणशी संपर्क साधला होता. मात्र निर्मात्यांनी साई पल्लवीच्या नावाबद्दल अजून कोणताही खुलासा केलेला नाही. जोपर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू होत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

जाहिरात

यापूर्वी, एका वेबसाइटने चित्रपटाचं चित्रीकरण 2023 मध्ये सुरू होणार असल्याची माहिती दिली होती. निर्माते अल्लू अरविंद यांनी खुलासा केला होता की ‘रामायण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि मागील 18 महिन्यांपासून चित्रपटाचं प्री-प्रॉडक्शन सुरू आहे. 2023 च्या उन्हाळ्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होईल. हा चित्रपट भारतीय सिनेमातील आतापर्यंत बनवण्यात आलेला सर्वात महागडा प्रकल्प असणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

साई पल्लवीच्या कामाबद्दल सांगायचं तर साई पल्लवी शेवटची ‘गार्गी’ या तामिळ चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट 15 जुलै 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. गौतम रामचंद्रन दिग्दर्शित चित्रपटात साई पल्लवीची मुख्य भूमिका होती. आता साई पल्लवी ‘रामायण’ या सिनेमाचा भाग असल्याने तिच्या चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात