मुंबई, 06 जुलै: संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. सगळेच पावसाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. पावसात वाफाळता चहा आणि कांदा भजी हे समीकरणचं काही वेगळं आहे. सगळेच आपापल्या परीनं पाऊसाची मज्जा घेत आहेत. अनेक कलाकारही मनसोक्त पावसाचा आनंद घेत आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अभिनेता सुनिल बर्वेही ( Sunil Barve) पावसाची पुरेपूर मजा घेताना दिसतोय. सुनीलनं तर थेट वडापाव ( Vada Paav) मिरची आणि सोबत गरमा गरम भज्यांवर ताव मारला आहे. बाहेर कोसळणारा पाऊस आणि सुनील बर्वेची खादाडी चांगलीच जमून आली आहे. सुनीलनं एका हॉटेलमधील त्याला एक व्हिडीओ शेअर केल आहे. ज्यात त्याच्या हातात वडापास आणि ताटात तळलेल्या तिखड मीठ लावलेल्या झणझणीत मिरच्या दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सुनील एका हातानं बडापाव आणि दुसऱ्या हातानं मिरची तोडताना दिसतोय. गरमागरम वडापास मिरच्यांचा आस्वाद घेणाऱ्या सुनील बर्वेच्या चेहऱ्यावरचा आनंद फार लाजवाब आहे. ‘आज तो माहौल बन गया है! मिरची का झटका और पाव भजिया! हम तो ऐसेच है भैया!’, असं हिंदीत भन्नाट कॅप्शन देत सुनीलनं त्याचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हेही वाचा - रमा अक्षयचा रोमँटिक अंदाज! मुरांबाच्या महाएपिसोडमध्ये बरसणार प्रेमाचा पाऊस
अभिनेता सुनील बर्वेचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्स करत ‘मलाही हवा वडा पाव’, असं म्हटलंय. गरमा गरम वडापाव आणि मिरच्या खाणाऱ्या सुनीलला पाहून त्याच्या चाहत्यांच्या तोंडालाही पाणी सुटलं आहे. कळत नकळत, ग्रहण सारख्या प्रसिद्ध मालिकेतून टेलिव्हिजनवर प्रसिद्ध असलेला तसेच गोजिरी, जमलं हो जमलं, तू तिथं मी सारख्या लोकप्रिय मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सर्वांचा लाडका अभिनेता सुनील बर्वे. सुनीलनं आजवर अनेक नाटक आणि सिनेमात कामं केली मात्र अनेक सुनीलचा टेलिव्हिजनवर काम करण्याचा ओढा काही कमी झालेला नाही. अभिनेता सुनील बर्वे सध्या स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत काम करत आहे. त्यानं साकारलेला सुर्या दादा सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

)







