जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी; सचिन खरातांची मागणी

Video : राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी; सचिन खरातांची मागणी

Video :  राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी; सचिन खरातांची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी (Sachin Kharat) राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे- प्राजक्ता माळीचं नाव राज ठाकरे (raj thackeray) यांच्यामुळं चर्चेत आलं आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. आज प्राजक्ताने एक पोस्ट केली आणि काही वेळातच ती एडिट देखील केली. ही पोस्ट दुसऱ्या कुणाशी संबंधीत नव्हती तर राज ठाकरे यांच्याशी (Prajakta Mali Latest Post) संबंधीत होती. सध्या राज ठाकरेंसंबंधित (Raj Thackeray) प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी (Sachin Kharat) राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सचिन खरात यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातूनदेखील त्यांना काढण्यात यावे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये चिथावणीखोर भाषण केले. तरीदेखील प्राजक्ता माळी यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचं समर्थन केलं आहे. प्राजक्ता माळी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षण घेतलं व आज लोकप्रिय कलाकार झाला आहेत. वाचा- ‘आज ३ तारीख,. ’ प्राजक्ता माळीनं राज ठाकरे यांच्याविषयीची ‘ती’ पोस्ट केली एडिट प्राजक्ता माळीनं इन्स्टाला तिचा एक फोटो व आणखी एका बातमीचा फोटो शेअर करत सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट केली होती. प्राजक्ताने शेअर केलेल्या बातमीमध्ये मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिल्याचं दिसून येत आहे.याा पोस्टमध्ये तिनं मागच्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र काही काळातच तिनं ही पोस्ट एडिट केली. त्यामुळे सध्या प्राजक्ताच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

जाहिरात

काय म्हणाली होती प्राजक्ता माळी तिच्या पहिल्या पोस्टमध्ये ? प्राजक्ता माळीनं तिच्या पहिल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.), असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”. अशी काहीशी प्राजक्ता माळीची पिहिली पोस्ट होती.

News18

प्राजक्ता माळीनं एडिट केलेली पोस्ट प्राजक्तानं तिच्या पहिल्या पोस्टमध्ये एडिट करत म्हटलं आहे की,सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. 🙏सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईद च्या मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏.(आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय. 😅) असो…आज ३ तारीख…#prajakttamali @😇…नेटकऱ्यांना मात्र तिनं एडिट केल्याचे लगेच लक्षात आलं आहे. सध्या सगळीकडं तिच्या या पोस्टची चर्चा रंगलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात