मुंबई, 3 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. कोणत्या त्या कोणत्या कारणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता मात्र प्राजक्ता माळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने मनसेच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती तेव्हा ती मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगंली होती. यावर आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे प्राजक्ता माळीनं सोशल मीडिया पोस्ट लिहित स्पष्ट केलं होता. आता मात्र पुन्हा प्राजक्ता माळीचं नाव राज ठाकरे (raj thackeray) यांच्यामुळं चर्चेत आलं आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. आज प्राजक्ताने एक पोस्ट केली आणि काही वेळातच ती एडिट देखील केली. ही पोस्ट दुसऱ्या कुणाशी संबंधीत नव्हती तर राज ठाकरे यांच्याशी (Prajakta Mali Latest Post) संबंधीत होती. नेटकऱ्यांनी मात्र तिची ही चोरी लगेच पकडली आहे. प्राजक्ता माळीनं इन्स्टाला तिचा एक फोटो व आणखी एका बातमीचा फोटो शेअर करत सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट केली होती. प्राजक्ताने शेअर केलेल्या बातमीमध्ये मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिल्याचं दिसून येत आहे.याा पोस्टमध्ये तिनं मागच्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. मात्र काही काळातच तिनं ही पोस्ट एडिट केली. त्यामुळे सध्या प्राजक्ताच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काय म्हणाली होती प्राजक्ता माळी तिच्या पहिल्या पोस्टमध्ये ? प्राजक्ता माळीनं तिच्या पहिल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.), असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे (Raj Thackeray) सगळ्याचसाठी…परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”. अशी काहीशी प्राजक्ता माळीची पिहिली पोस्ट होती.
प्राजक्ता माळीनं एडिट केलेली पोस्ट प्राजक्तानं तिच्या पहिल्या पोस्टमध्ये एडिट करत म्हटलं आहे की,सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. 🙏सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईद च्या मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏.(आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय. 😅) असो…आज ३ तारीख…#prajakttamali @😇…नेटकऱ्यांना मात्र तिनं एडिट केल्याचे लगेच लक्षात आलं आहे. सध्या सगळीकडं तिच्या या पोस्टची चर्चा रंगलेली आहे.
यापूर्वी देखील मनसेच्या दसरा मेळाव्यास उपस्थिती लावत प्राजक्ता माळीनं एक पोस्ट केली होती. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं की,नाही नाही..,कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. 🎯🎯🎯काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर share करतेय…,इतकाच हेतू🎯
कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअरला जाणं गरजेचं तसच हेही.., म्हणून हा घाट. ( After all आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.)#सर्वांगीणविकास #समग्रजीवन#राजकारण #मुंबई#prajakttamali @🚩