'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zal) आणि 'फुलपाखरू' (Phulpakhru) या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) घराघरात पोहोचली आहे.
हृताचा फार मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्रीला अनेक लोक महाराष्ट्राची क्रशदेखील म्हणतात.हृता नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली. यावेळी इंडस्ट्रीतील तिच्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
यावेळी अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामतदेखील उपस्थित होते. हृताच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकात उमेश त्याचा सहकलाकार आहे तर प्रिया या नाटकाची निर्माती आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेता आदिश वैद्यसुद्धा आपली गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रेवती लेलेसह उपस्थित होता.