जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / व्लादिमीर पुतीन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या रशियन मॉडेलचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह!

व्लादिमीर पुतीन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या रशियन मॉडेलचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह!

व्लादिमीर पुतीन यांना मनोरुग्ण म्हणणाऱ्या रशियन मॉडेलचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह!

रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा (Russian Model Gretta Vedler) मृतदेह एका सुटकेसमधून सापडला आहे. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रशिया, 17 मार्च: रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा (Russian Model Gretta Vedler) मृतदेह एका सुटकेसमधून सापडला आहे. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. 23 वर्षीय ग्रेटा जवळपास एक वर्षापासून बेपत्ता होती. मात्र तिचे सोशल मीडिया अकाउंट सुरू होतं. ग्रेटा पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना मनोरुग्ण म्हटल होतं. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, मॉडेल ग्रेटा वेडलरची हत्या तिच्या एक्स बॉयफ्रेंड दिमित्री कोरोविनने (Dimitry Korovin) केली होती. कोरोविननं ग्रेटाचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून कारच्या ट्रंकमध्ये टाकला. आता कोरोविनने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि असे म्हटलं आहे की, त्याने ग्रेटा वेडलरला 300 मैल दूर रशियाच्या लिपेटस्क येथे नेलं होतं, जिथे त्याने ग्रेटाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि कारच्या ट्रंकमध्ये असाच सोडून दिला होता. पैशाच्या वादातून हत्या पैशाच्या वादातून दिमित्री कोरोविननं ग्रेटाची हत्या केल्याचं सांगण्यात आलं. या हत्येचा आणि ग्रेटाच्या राजकीय वक्तृत्वाचा काहीही संबंध नसल्याचं मानलं जात आहे. कोरोविनने तपासकर्त्यांना सांगितले की, तो तीन रात्री हॉटेलच्या खोलीत ग्रेटाच्या मृतदेहासोबत झोपला होता. ग्रेटाच्या मृत्यूनंतर कोरोविननं तिचं सोशल मीडिया पेज अपडेट करत होता, जेणेकरुन कोणालाही तिच्या मृत्यूचा किंवा गायब झाल्याचा संशय येऊ नये. सध्या ग्रेटाचा एक्स बॉयफ्रेंड कोरोविन यानं हत्येची कबुली दिली आहे. त्याच्या सांगण्यावरून ग्रेटाचा मृतदेहही सापडला. युक्रेनसोबत सुरू (Russia Ukraine War) असलेल्या युद्धाच्या दरम्यान रशियन मॉडेल ग्रेटाचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रशियन मॉडेलने (Russian Model) वर्षभरापूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर उघडपणे टीका केली होती, त्यानंतर ती बेपत्ता होती. मात्र आता तिचा मृतदेह सापडला असून मारेकऱ्यानंही आपला गुन्हा मान्य केला आहे. आरोपी मॉडेल ग्रेटाचा एक्स बॉयफ्रेंड आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात