मॉस्को, 05 ऑक्टोबर : पूर्वी अंतराळात (Space) जाणं हे केवळ अंतराळवीरांनाच शक्य होतं. त्यासाठी लागणारा अभ्यास, प्रशिक्षण यामुळे कोणीही उठून अंतराळात जाऊ शकत नव्हतं. मागच्या महिन्यातच स्पेस-एक्स कंपनीने चार सामान्य व्यक्तींना अंतराळात (Normal people in space) पाठवून इतिहास रचला होता. त्यानंतर आता रशियाही अशीच एक ऐतिहासिक कामगिरी करणार आहे (Film shooting in space). रशिया चक्क अंतराळात एका सिनेमाचं शूटिंग (Russia to shoot a movie in space) करणार आहे. यासाठी चित्रपटाच्या अभिनेत्रीसह संपूर्ण क्रू आज (5 ऑक्टोबर 2021) अंतराळात (Actress and crew to go in space) पोहोचले. ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळ संशोधनामध्ये रशिया अमेरिकेच्याही एक पाऊल पुढे जाणार आहे.
केवळ अंतराळ संशोधनच नाही, तर या प्रोजेक्टमुळे रशियाची चित्रपट इंडस्ट्री हॉलिवूडच्या पुढे जाईल. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि हॉलिवूडने (Nasa and Hollywood projrct) या वर्षाच्या सुरुवातीला एका अशाच प्रोजेक्टची घोषणा केली होती. यासाठी खासगी अंतराळ संशोधन संस्था असलेल्या स्पेसएक्सने हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टॉम क्रूजसोबत (SpaceX and Tom Cruise project) हा प्रोजेक्ट करणार असल्याचं म्हटलं होतं. या मोहिमेचे कोणतेही अपडेट्स अजून तरी मिळालेले नाहीत.
हे वाचा - पहचान कौन? मास्क आणि गॉगल घालून ‘या’ मराठमोळया अभिनेत्याने केला बसमधून प्रवास
अंतराळात शूटिंग होणाऱ्या रशियाच्या या चित्रपटाचं नाव ‘दी चॅलेंज’ (The Challenge movie) असं आहे. अंतराळात या चित्रपटाचे विविध सीन शूट केले जातील. यात एका महिला डॉक्टरची कथा दाखवण्यात येणार आहे, जी एका अंतराळवीराला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर जाते.
The Soyuz crew ship hatch to the station opened at 11am ET and three Russian crewmates entered the station increasing the space population to 10. https://t.co/05zsK3fkeH
— International Space Station (@Space_Station) October 5, 2021
रशियाची अंतराळ संस्था असलेल्या रॉसकॉसमॉसने (Roscosmos) याबाबत माहिती दिली आहे. याचं दिग्दर्शन क्लिम शिपेंको (Klim Shipenko) करणार आहेत. युलिया परेसिल्ड (Yulia Peresild) ही 37 वर्षांची अभिनेत्री यात दिसणार आहे. या सर्वांना कझाकिस्तानच्या बॅकोनूर कॉस्मोड्रोममधून रवाना करण्यात आलं. अनुभवी अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव (Anton Shkaplerov) हे या संपूर्ण पथकाचं नेतृत्व करत आहेत..
हे सर्व पथक पृथ्वीवर परतताना त्यांचं नेतृत्व ऑलेग नोवित्स्की (Oleg Novitsky) हे अंतराळवीर करतील. ते गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर आहेत. चित्रपटाचं पथक 17 ऑक्टोबरला परत येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अंतराळात शूट झालेला हा जगातला पहिला चित्रपट ठरेल.
हे वाचा - Bigg Boss Marathi 3 च्या घरात जाण्याआधी अक्षयने घेतला होता 'हा' मोठा निर्णय
दरम्यान, रशियामध्ये सध्या अंतराळ संशोधनापेक्षा सैन्यदलावर जास्त प्रमाणात खर्च केला जातो आहे. त्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्र बरंच मागं पडलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा प्रयोग यशस्वी झाल्यास, ती देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी नवसंजीवनी ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Russia, अंतराळ