मुंबई, 27 फेब्रुवारी- 'बिग बॉस 14'
(Bigg Boss 14) विजेती आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री
(Tv Actress) रुबिना दिलैकने
(Rubina Dilaik) तिच्या इन्स्टाग्रामवर
(Instagram Post) सर्वांनांच चिंतेत टाकणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिच्या पाठीला जबर दुखापत झालेली दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा फक्त मागचा पाठीचा भाग दिसत आहे. तिने पाठीच्या दुखापतीचा फोटो शेअर करून सर्वांनाच चिंताग्रस्त केलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. तसेच तिच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू लागली आहे. चाहते तिच्या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत. तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
पाठीच्या दुखापतीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत रुबिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "सगळं काही तुमच्या योजनेनुसार होत नाही."तिने कॅप्शनसह रडणारा इमोजी देखील शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या कॅप्शनमध्ये असे दिसते आहे की तिच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे. परंतु तिला इतकी गंभीर दुखापत कशी आणि कुठे झाली याबद्दल तिने काहीही सांगितले नाही.
फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की रुबिनाच्या मागच्या बाजूला डाव्या खांद्याला हीलिंग टेप लावलं आहे. आणि ती खिडकीच्या बाहेर पाहत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीची फक्त मागची बाजू दिसत आहे. फोटो पाहून तिच्या खांद्याला जबर दुखापत झाल्याचे दिसते. चाहते रुबिनाच्या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत आणि तिच्या दुखापतीबद्दल विचारत आहेत. काही चाहते तिच्यासाठी दु:खी होत आहेत तर काही तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत.

रुबिना दिलैकी हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. छोटी बहू आणि शक्ती-अस्तित्व सारख्या मालिकांद्वारे तिने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, 'बिग बॉस 14' ची विजेती झाल्यानंतर तिचा चाहतावर्ग प्रचंड वाढला आहे. या शोमधील तिची खरी व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.