मुंबई, 21 मार्च : रुबिना दिलैकला तिच्या चाहत्यांनी अनेकदा ग्लॅमरस अवतारात पाहिलं असेल, पण खेड्यातील जीवनाशीही तिची ओढ कायम आहे. तिला जेव्हा जेव्हा कामातून मोकळा वेळ मिळतो तेव्हा ती गावाला पोहोचते आणि तिथल्या संस्कृतीत रमून जाते. रुबिना मूळची हिमाचल प्रदेशातली आहे. गावात घालवलेल्या सुंदर क्षणांची झलक ती इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे.
रुबिना दिलैकने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोंगराळा भागातील महिलांच्या वेशात दिसत आहे. तसेच ती चुलीसमोर बसून काहीतरी खाताना दिसत आहे. ती चुलीवर काहीतरी शिजवत आहे आणि आग वाढवण्यासाठी फुंकणीने चुलीत फुंकर मारताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. तिने 11 तासांपूर्वी हा व्हिडिओ शेअर केला होता, त्यावर जवळपास 1.5 लाख लाईक्स आले आहेत.
हेही वाचा - Bhumika Chawala: सलमानची हिरॉईन म्हणून हिट; मग अचानक इंडस्ट्रीतून झाली गायब; आता काय करते ही अभिनेत्री?
व्हिडिओमध्ये रुबिना दिलैक हिमाचल प्रदेशच्या पारंपारिक पोशाखात भारतीय स्त्रीप्रमाणे कुंकू आणि टिकली लावून दिसत आहे. तसेच ती चुलीवर शिजवलेल्या रताळ्याचा आस्वाद घेत आहे. तिचा हा साधेपणा तिच्या चाहत्यांनाही खूप भावला आहे. ते व्हिडिओवर कमेंट करून रुबिनाचं कौतुक करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करून विचारलं, 'तुम्ही काय खात आहात?' दुसरा युजर म्हणतो, 'पारंपरिक पोशाखात सुंदर दिसत आहेस.' अनेकांनी तिच्या या लूकचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, रुबिना या पूर्वी अनेकदा ग्रामीण जीवनाचा आनंद घेताना दिसली आहे.
View this post on Instagram
रुबिना लहान बहीण ज्योतिका दिलैकच्या लग्नासाठी गावी गेली होती. तिच्याबरोबर तिचा पती अभिनव शुक्लादेखील होता. ज्योतिकाने रजत शर्माशी लग्न केलं. या लग्नात रुबिना आणि अभिनवने खूप धमाल केली होती. दोघांनी या लग्नातील खास फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते.
ज्योतिका-रजतच्या लग्नात अभिनव व रुबिना खूप सुंदर दिसत होते. त्यांच्या हळदी, संगीत व लग्नाच्या फोटोंची चांगलीच चर्चा होती. अभिनवने ज्योतिकाच्या लग्नात मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडली होती. या लग्नात रुबिनाचे आऊटफिट आणि मेकअपही खूप चर्चेत होते. बहिणीचं लग्न झाल्यावर ती काही दिवस घरीच थांबली आहे. आता ती पालकांबरोबर वेळ घालवत असून काही व्हिडिओ देखील शेअर करत आहे. तिचे हे व्हिडिओ चाहत्यांनाही खूप आवडत आहेत. ते तिच्या फोटो-व्हिडिओंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Entertainment, Rubina dilaik, Videos viral, Viral