मुंबई, 18 डिसेंबर : बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावरून तिने ही गोड बातमी शेअर केली आहे. नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर पति रोहनप्रीत सिंहसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीवर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नेहा आणि रोहनप्रीत दोन महिन्यांपूर्वीच 24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे केवळ चाहतेच नाही, तर अनेक युजर्सही कमेंट करून नेहाच्या प्रेग्नेंसीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.
जाहिरात
नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर हनिमूनसाठी दोघे दुबईला गेल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. लग्न, हनिमून आणि आता नेहाच्या प्रेग्नेंसीही सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







