मुंबई 5 एप्रिल: सुपरहिरो आयर्नमॅन (Iron Man) म्हणून भारतात लोकप्रिय झालेला हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर (Robert Downey Jr) हा भारतीय संस्कृतीचा खूप मोठा चाहता आहे. तो नेहमीच भारतीयांची तोंड भरुन स्तुती करतो. नुकताच त्यानं वाढदिवस साजरा केला. 56 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतातील लाखो चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. अन् त्याने देखील भारतीय चित्रपटांची स्तुती करुन देशवासीयांचं मन पुन्हा एकदा जिंकलं. त्याला बॉलिवूड अभिनेता अमिर खान प्रचंड आवडतो. आमिर खान (Aamir Khan) म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स (Tom Hanks) असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली.
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट डाऊनी ज्युनियरनं बॉलिवूड चित्रपटांवर स्तुतीसुमनं उधळली. तो म्हणाला, “मी बॉलिवूड चित्रपट आवडीने पाहातो. परंतु त्यामध्ये मला आमिर खानचे चित्रपट जास्त आवडतात. ‘लगान’ हा चित्रपट पाहून मी त्याचा फॅन झालो. त्याने या चित्रपटात कमालीचा अभिनय केला आहे. त्याला पाहून मला टॉम हँक्स आठवतात. मी तर आमिरला बॉलिवूडचा टॉम हँक्सच म्हणेन. संधी मिळाली तर मला आमिरसोबत काम करायला नक्की आवडेल.”
अवश्य पाहा - ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या एजाज खानला झाली कोरोनाची लागण
टॉम हँक्स हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. 70-80चं दशक त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवर होतं. ‘फॉरेस्ट गम्प’, ‘कास्ट अवे’, ‘कॅप्टन फिलिप्स’, ‘कॅच मी इफ यु कॅन’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांना दोन वेळा ऑस्कर पुरस्कारानंही सन्मानित केलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी ते वाट्टेल ते करु शकतात. असाच काहीसा प्रयत्न आमिर खान देखील करताना दिसतो. त्यामुळं आयर्नमॅन आमिर खानला बॉलिवूडचा टॉम हँक्स म्हणतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood, Entertainment, Star celebraties