जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण...

चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण...

चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; कारण...

विनोदाचा बादशाह मृत्यूनंतरही होता चर्चेत; पाहा संपूर्ण जगाला हादरवणारी घटना

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 16 एप्रिल: चार्ली चॅप्लिन (Charlie Chaplin) हे मनोरंजनसृष्टीच्या इतिहासातील अजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय विनोदवीरांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अगदी पु.ल.देशपांडेंपासून प्रल्हाद केशव अत्रेंपर्यंत विनोदी साहित्याची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकानं चार्ली यांना आपलं प्रेरणास्थान मानलं. यावरुनच या कलाकाराच्या महानतेचा अंदाज येतो. शब्दांशिवाय चित्रपट किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिन. केवळ हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या या महान विनोदवीराची आज 132 वी जयंती आहे. या निमित्तानं त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाहूया काय होता तो थक्क करणारा किस्सा**?** 1977 साली वयाच्या 88 व्या वर्षी चार्ली चॅप्लिन यांचं निधन झालं. त्यानंतर काही दिवसात त्यांचा मृतदेह चोरीला गेला होता. काही चोरट्यांनी कबर खणून त्यांचा मृतदेह चोरला. पैसे उकळण्यासाठी ही विचित्र चोरी करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी सापळा रचून या चोरांना अटक केली. विशेष म्हणजे चोरांनी तब्बल 11 महिेने मृतदेहाला आहे त्याच परिस्थितीत सांभाळून ठेवलं होतं. (Robbers steal Charlie Chaplins body for Ransom) अवश्य पाहा - पाहावं ते अजबच! मंगळ ग्रहावर जाण्यासाठी गायिकेनं काढला एलियन टॅटू चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यावर एक चित्रपट तयार केला जात आहे. या चित्रपटाचे नाव ‘चार्ली चॅप्लिन: अ मॅन ऑफ द वर्ल्ड’ असे आहे. हा एक डॉक्युमेंट्री प्रकारातील चित्रपट आहे. यामध्ये त्यांचे पडद्यामागचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले जातील. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांच्या मृतदेह चोरीचा किस्सा देखील दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती चार्लीची नात कार्मन चॅप्लिन करणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. परंतु कोरोनामुळं शूटिंग लांबणीवर गेलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात