मुंबई, 10 मार्च- नागराज मंजुळे यांचा झुंड**( jhund )** हा बहुप्रतिक्षित चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. झुंड चित्रपट पाहून अनेक बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. अनेक दिग्दर्शकांनी हा चित्रपट ऑस्करसाठी जायला पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. तर आमिर खानने देखील नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे. क्रिटीक्सपासून ते सोसल मीडियावर देखील सिनेमाचं कौतुक होत आहे. अभिनेता रितेश देशमुखने ( riteish deshmukh reaction on jhund ) देखील झुंड सिनेमा पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दल मत मांडलं आहे. यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. रितेश देशमुख याने ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘स्वतःवर थोडी दया करा आणि ‘झुंड’ चित्रपट कृपया चित्रपटगृहात जाऊन पाहा. नागराज मंजुळे देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला रडवतो देखील आणि आनंदी देखील करतो. याशिवय तो वेदनांचा अनुभव देतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तुम्हाला समाजातील भिंतीने विभागलेल्या दोन भारतांचा विचार करायला लावतो..असं काहीसं ट्वीट रितेशने केले आहे. यासोबत त्याने त्याचा सिनेमाच्या पोस्टरसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. रितेशचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. वाचा- ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर खिलाडी कुमारचा क्रितसोबत ढासू डान्स Viral बॉलिवूड कलाकारांसोबत अनेक मराठी कलाकारांनी देखील नागराज मंजुळे यांच्या सिनेमाचे कौतुक केलं आहे. शिवाय सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची विनंती देखील केली आहे. सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी केदार शिंदे यांनी देखील झुंड सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडिया पोस्ट करत या सिनेमाबद्दल मत व्यक्त केले आहे. शिवाय नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे.
Please do your self a favour and watch #Jhund on the big screen. @Nagrajmanjule is the bestest director in the country - he makes you cry, cheer, feel the pain, the euphoria and most importantly he makes you think of two Indias divided by a compound wall. pic.twitter.com/FUICTg39ey
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 6, 2022
झुंड( jhund ) सिनेमात बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमातील स्टार कास्टचे देखील कौतुक होत आहे. रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांची जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकत्र पाहता आली. सैराटमध्ये देखील या दोघांनी अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकले होते. झुंड सिनेमात देकील या दोघांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.