जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / क्रांती रेडकरच्या बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या Tweet वर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

क्रांती रेडकरच्या बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या Tweet वर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

क्रांती रेडकरच्या बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या Tweet वर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने देखील यानिमित्त ट्विट केले आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 नोव्हेंबर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  (Balasaheb Thackeray) यांचा आज (17 नोव्हेंबर) स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. ट्विटवर #BalasahebThackeray हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने (kranti redkar) देखील यानिमित्त ट्विट केले आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ट्विटरवर यावरून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहे. क्रांतीने ट्वीट करत म्हटले आहे की, ‘आज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. विनम्र अभिवादन. जय महाराष्ट्र’. तिच्या या ट्वीटवर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जाहिरात

एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की,क्रांती ताई तुमच्या सासऱ्यानी मलिक यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता त्याच निकाल काय लागला?…तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, खूप वाईट वाटते की त्यांचा परिवार आज त्यांचा व त्यांच्या मुल्यांचा आदर करत नाही. तर आणखीन एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, सध्याच्या राजकारणाची स्थिती पाहता बाळासाहेब ठाकरे यांची कमी भासते…अशा प्रतिक्रिया क्रांतीच्या ट्विटवर उमटल्या आहेत. वाचा :  अभिनेता अनिकेत विश्वासरावने मारहाण केल्याचा पत्नीचा आरोप; तक्रार दाखल आर्यन खान प्रकरणानंतर क्रांती रेडकर व तिचे पत्नी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेक आले आहे. नवाब मलिक यांची समीर वानखेडे यांच्यावर आरोपाची मालिका सुरूच आहे. काही दिवसापूर्वी याप्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिले होते. हे पत्र सगळीकडे चर्चेचा विषय ठरलं होते. वाचा :  दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने सीक्रेट डेस्टिनेशनवर साजरी केली Wedding Anniversary क्रांतीने या पत्रामध्ये म्हटलं होतं की, “आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं… एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे, हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) आहात… अशा अशायचं पत्र क्रांतीनं लिहिलं होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात