मुंबई, 22 मे : अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सध्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणारी रिंकू तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. लॉकडाऊनमध्ये तिचं काय सुरू आहे, तिचे अपकमिंग प्रोजेक्ट्स यासंदर्भात ती नेहमीच काहीना काहीतरी शेअर करत असते. दरम्यान रिंकूने नुकताच एक 20 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रिंकूने साडी नेसली आहे. साडीमधील अदांनी तिच्या चाहत्यांना अक्षरश: घायाळ केले आहे.
या व्हिडीओवर नेहमीप्रमाणेच खूप कमेंट्स देखील आल्या आहेत. एका चाहत्याने तर चक्क रिंकूला लग्नाची मागणी घातली आहे. 'माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का?' असा थेट प्रश्न या चाहत्याने तिला विचारला आहे.
'सैराट'च्या तुफान यशानंतर घराघरात 'रिंकू राजगुरु' हे नाव घराघरात पोहोचलं. सैराटनंतर तिने कधी मागे वळून पाहिलच नाही. काही दिवसांपूर्वी रिंकूची 'हंड्रेड' ही हिंदी वेबसीरिज रिलीज झाली आहे. त्यामध्ये देखील रिंकूने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. यामध्ये ती 'नेत्रा पाटील' ही भूमिका साकारत आहे. मराठीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या रिंकूने हिंदी डिजिटल जगतामध्ये पाय रोवण्यास सुरूवात केल्याने सध्या तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे. यामध्ये ती अभिनेत्री लारा दत्ताबरोबर स्क्रीन शेअर करत आहे.
छोट्याशा गावातून आलेल्या रिंकूने केवळ मोठी स्वप्न पाहिली नाही तर ती स्वप्न रिंकूने पूर्णही केली. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत आला आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.