रिंकू राजगुरुचा हॉट लुक सोशल मीडियावर हिट, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा

रिंकू राजगुरुचा हॉट लुक सोशल मीडियावर हिट, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा

'सैराट'च्या तुफान यशानंतर घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे 'रिंकू राजगुरु'. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या रिंकूचा एक बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 04 मे : 'सैराट'च्या तुफान यशानंतर घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे 'रिंकू राजगुरु'. सैराटनंतर तिने कधी मागे वळून पाहिलच नाही. रिंकू सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय असते. लॉकडाऊनमध्ये तिचं काय सुरू आहे, तिचे अपकमिंग प्रोजेक्ट्स यासंदर्भात ती नेहमीच काहीना काहीतरी शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर देखील अनेक असे फोटो आहेत जे काही वेळातच व्हायरल झाले आहे. सध्या रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवर असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या रिंकूचा हा बोल्ड लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. बोल्ड, ब्युटीफूल आणि कडक अशा काही कमेंट्स तिच्या या लुकवर पाहायला मिळाल्या.

View this post on Instagram

 

Do not give up the beginning is always the hardest🏃‍♀️ Stay safe stay fit😁

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

काही दिवसांपूर्वी रिंकूची 'हंड्रेड' ही हिंदी वेबसीरिज रिलीज झाली आहे. त्यामध्ये देखील रिंकूने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. मराठीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या रिंकूने हिंदी डिजिटल जगतामध्ये पाय रोवण्यास सुरूवात केल्याने सध्या तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे. यामध्ये ती अभिनेत्री लारा दत्ताबरोबर स्क्रीन शेअर करत आहे.

छोट्याशा गावातून आलेल्या रिंकूने केवळ मोठी स्वप्न पाहिली नाही तर ती स्वप्न रिंकूने पूर्णही केली. त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत आला आहे.

First published: May 4, 2020, 11:23 AM IST

ताज्या बातम्या