जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / रिहाना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गणपतीचं लॉकेट घालून केलं टॉपलेस फोटोशूट

रिहाना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गणपतीचं लॉकेट घालून केलं टॉपलेस फोटोशूट

रिहाना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; गणपतीचं लॉकेट घालून केलं टॉपलेस फोटोशूट

पॉपस्टार रिहानानं नुकतंच एक टॉपलेस फोटोशूट केलं. या फोटोमध्ये तिनं गळ्यात गणपतीचं लॉकेट घातलेलं दिसत आहे. परिणामी भारतीय नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 फेब्रुवारी : जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना (Rihanna) आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि न्यूड फोटोशूटमुळं नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिनं देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातही भाग घेऊन भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिनं केंद्र सरकावर निशाणा साधत भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिहाना चर्चेत आहे. मात्र यावेळी ती कुठल्याही आंदोलनामुळे नव्हे तर आपल्या एका न्यूड फोटोमुळं चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा फोटो काढताना तिनं आपल्या गळ्यात चक्क श्री गणेशाचं लॉकेट घातलं आहे. (Ganesha necklace) रिहाना नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळं चर्चेत असते. अलिकडेच तिनं आपल्या एक्स फेंटी या वेबसाईटसाठी एक न्यूड फोटोशूट केलं. (Rihanna poses topless photoshoot ) यापैकी एक फोटो तिनं ट्विटरवर शेअर केला. मात्र हा फोटो पाहून भारतीय नेटकरी संतापले आहेत. कारण हे न्यूड फोटोशूट करताना तिनं आपल्या गळ्यात श्री गणेशाचं लॉकेट घातलं होतं. “तू आमच्या देवतेचा अपमान करत आहेस.” अशा आशयाची ट्विट्स करुन भारतीय नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. अर्थात या ट्विटवर रिहानाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जाहिरात

अवश्य पाहा -  मलायकाचं बाळ सहा वर्षांचं झालं; फोटोंवर होतोय शुभेच्छांचा वर्षाव रिहाना ही जगप्रसिद्ध पॉपस्टार आहे. वयाच्या 17 व्या वर्षी रिहानानं आपलं करियर सुरू केलं. ‘म्युझिक ऑफ द सन’, ‘अ गर्ल लाइक मी’ हे तिचे सुरवातीचे दोन अल्बम लक्षवेधी ठरले. रिहानाचा २००७ साली आलेला अल्बम ‘अ गर्ल लाइक मी’ जगभरात प्रचंड गाजला होता. अंब्रेला या तिच्या कंपोजिशनला प्रतिष्ठेचं ग्रॅमी अवॉर्ड मिळालं. रिहाना अशी पहिली आर्टिस्ट आहे जिनं लंडनच्या ओटू एरिनामध्ये 10 कॉन्सर्ट्स केल्या आहेत. 32 वर्षाची रिहाना आजवर घरगुती हिंसा, एलजीबीटीक्यु, डोनाल्ड ट्रंप यांची धोरणं अशा अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडत आली आहे. रिहाना केवळ एक गायिका नाही तर यशस्वी बिझनेसवुमनही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात