Home /News /entertainment /

दीपिकाची सटकली; शिव्या घालणाऱ्या ट्रोलर्सची केली बोलती बंद

दीपिकाची सटकली; शिव्या घालणाऱ्या ट्रोलर्सची केली बोलती बंद

नेटकऱ्याने तर एक पाऊल पुढे जात दीपिकाला अत्यंत वाईट शब्दात सुनावलं. त्याच्या या शिव्या पाहून दीपिकाची देखील सटकली. अन् तिनं देखील या नेटकऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

    मुंबई, 15 फेब्रुवारी : सिनेकलाकार गेल्या काही काळात अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत राहू लागले आहेत. सोशल मीडिया हा प्रसिद्धी मिळवण्याचा सर्वात सहज आणि सोपा मार्ग आहे. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी कलाकार आपले फोटो आणि व्हिडीओज सतत शेअर करताना दिसतात. परंतु सतत नेटकऱ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळं अनेकदा कलाकारांना ट्रोलर्सचा सामना देखील करावा लागतो. अनेक कलाकारांवर प्रेक्षक त्यांच्या वैयक्तीक आयुष्यावरुन टीका करतात. काही वेळा तर शिव्या देखील घालतात. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) घडला. परंतु तिनं देखील या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिकानं अलिकडेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र तिचे हे फोटो काही नेटकऱ्यांना आवडले नाहीत. परिणामी काही नेटकऱ्यानी खिल्ली उडवत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. साहिल शाह नामक नेटकऱ्याने तर एक पाऊल पुढे जात दीपिकाला अत्यंत वाईट शब्दात सुनावलं. त्याच्या या शिव्या पाहून दीपिकाची देखील सटकली. अन् तिनं देखील या नेटकऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.“वाह, काय कॉमेंट केली आहेस मित्रा, तुझी ही कॉमेंट वाचून कुटुंबीयांना तुझा अभिमान वाटत असेल ना?” अशा आशयाची प्रतिक्रिया देत दीपिकानं त्या ट्रोलर्सची बोलती बंद केली. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवश्य पाहा - अभिनेता सचिननं केला कोट्यवधींचा घोटाळा; ईडीनं केली अटक दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर येत्या काळात ती अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. सर्वप्रथम ती बाहुबली फेम प्रभाससोबत झळकणार आहे. त्यानंतर हृतिक रोशनसोबत फायटरमध्ये ती काम करणार आहे. पुढे शाहरुखच्या पठाण या चित्रपटात ती महत्वाची भूमिका साकारताना दिसेल.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Deepika padukone, Entertainment, Instagram, Savage reply, Social media, Trollers

    पुढील बातम्या